Saturday, July 7, 2012

पाऊस(त्याच्या मनातला)




त्या दूर आभाळामधुनी.. 
सांडले अनामिक मोती, 
तुझ्या पापण्यांवरची..
ती सरही नाजूक होती


लागे मज कसली आस?
या धूर्त किनाऱ्यावरती,
सुखवे स्पर्श लाटेचा..
उरली ती कोवळी रेती


मी मुक्त खयाली वेडा..
मन तुझे उमगले नाही,
आभास तुझे भवताली..
पाऊस उलगडे नाती!


मनमौजी मी अलवार
झेलतो सरी हातात..
वाटे जणू अल्लड वारा,
घुटमळतो या मेघांत.


वीज लखलखते ही न्यारी,
पडसाद अंतरी मोठे..
डोळ्यात तुझ्या तेव्हाही
हे क्षण मी वेचले होते...





 

ता.क...:फार सुंदर पाऊस पडतोय.. त्यानेच भाग पाडलंय हे लिहायला..)
५ जुलै २०१२ 

12 comments:

  1. आहाहा! अष्टाक्षरी आणि पाऊस दोन्ही माझ्या आवडीचे ;)

    मी मुक्त खयाली वेडा..
    मन तुझे उमगले नाही,
    आभास तुझे भवताली..
    पाऊस उलगडे नाती!
    >>
    हे जास्त आवडलं

    सुंदर!

    ReplyDelete
  2. केवळ हळुवार मनालाच अशी कविता जमू शकेल. आणि हळुवार मनाच्या माणसालाच ती कळू शकेल.

    ReplyDelete
  3. वीज लखलखते ही न्यारी,
    पडसाद अंतरी मोठे..
    डोळ्यात तुझ्या तेव्हाही
    हे क्षण मी वेचले होते...

    ReplyDelete
  4. वीज लखलखते ही न्यारी,
    पडसाद अंतरी मोठे..
    डोळ्यात तुझ्या तेव्हाही
    हे क्षण मी वेचले होते...

    ReplyDelete
  5. छान शब्दांकन ,

    ReplyDelete