Thursday, February 14, 2013

आजची 'गोष्ट'!!



          माणूस ,मानवी स्वभाव आणि मन या तीनही गोष्टी अनाकलनीय आहेत. खर तर जाणीव लहानपणापासूनच होत असते...माणूस मोठा होईपर्यंत जाणीवा प्रगल्भ होत जातात. मन दुखावले गेले की फुरंगटून बसन किंवा रडत बसण हे वय वर्ष थेट १५-२०पर्यंत चालत होत.(अर्थात आताही अस होतंच की!!) पण मोठ होता होता जाणवत अलीकडे मन वगैरे नाही दुखवल जात. दुखावतो तो अहंकार!! मन ही  संकल्पना प्रेम वगैरेसारख्या नाजूक...नाजूक म्हणण्यापेक्षा संवेदनशील नात्यात अस्तित्वात असते..बहुधा!!म्हणूनच आज व्हेलेंटाइन डे च्या निमित्ताने 
प्रेम दिवस साजरा करतो आपण. प्रेम आणि मन याचं नातच इतक दृढ आहे कदाचित.. प्रेमाचा विरूद्धार्थ राग .प्रेमात हळवेपणा.....कातर मन, रागात एक घाव दोन तुकडे...

प्रेमाबद्दल बरंच  लिहील जात,लिहायलाही हव म्हणा...प्रसन्न क्षणांना अधिकार आहे व्यक्त होण्याचा.....
पण राग?..या रागोबाला आवरायचं तरी कस?
तर याच पार्श्वभूमीवर अलीकडेच ऐकलेली एक गोष्ट शेअर करावीशी वाटते आहे. नाही नाही मी सतीश राजवाडेंच्या ' प्रेमाची गोष्ट' बद्दल नाही म्हणत आहे..जरी माझी गोष्टसुद्धा साधी सरळ आणि तरल असली तरी..          तर;एक मुलगा असतो. अतिशय शांत,सरळ,साधा...सगळे मित्र-मैत्रिणी त्याला घुम्या म्हणून चिडवायचे. मुलगा आणखी अबोल झाला. हळूहळू त्याला त्रास देणारे मित्र-मैत्रिणी त्याला आणखी चिडवू लागले. आणि  ह्याला खूप राग येऊ लागला. राग आला तरी हा फक्त रडायचा कारण 
उलट उत्तर देण स्वभावातच नव्हत .मुलाच्या आईला आपल्या मुलाच घुमेपण आणि अव्यक्त चिडचिड कळत  होती. एकदा सहज आईने त्याला एक लाकडी ठोकळा दिला. आणि म्हणाली" जेव्हा तुला राग येईल न तेव्हा या ठोकळ्यात  एक खिळा ठोकत जा..जेवढा राग येईल तेवढ्या रागात खिळा  ठोकला जायला हवा बर का?" 

         मुलासाठी हे नवीन होत. तरी त्याने खिळा ठोकण सुरु केल. त्याच दिवशी १० खिळे!! हळू हळू मुलाच्या लक्षात येऊ लागल...खिळा ठोकला 
की थोडं बर वाटतंय ...दिवसागणिक मुलाकडून कमी खिळे ठोकले जाऊ लागले. मध्येच एकही खिळा  ठोकला नाही असंही घडू लागलं. काही कालावधीनंतर मुलाच्या लक्षात आलं;ठोकळा भरून गेलाय खिळ्यांनी ...आपण हल्ली कमी रागावतो. आईला हे सांगायला हव...आपण बर्-याच कालावधीत एकही खिळा ठोकलेला नाही आणि तरीही आपल्याला छान वाटतंय. तो आनंदाने ठोकळा घेऊन आईकडे गेले आणि म्हणाला," आई,हा बघ..हा ठोकळा भरलाय खरा पण गेले कित्येक दिवसात मी खिळा  ठोकलाच नाहीये. आई म्हणाली " वा छान!बर आता एक काम कर,आजपासून रोज एकेक खिळा काढायला सुरुवात करत जा"..हे ऐकून मुलगा हसत म्हणाला,राग कमी झाला म्हणून?ठीक आहे " बरेच दिवस झाले...हळूहळू ठोकळ्यावरचे खिळे  कमी होऊ लागले....        

          अस करता करता एक दिवस ठोकळा पूर्णपणे रिकामी झाला. मुलगा खूप आनंदात आईकडे गेला आणि म्हणाला ,"आई ग, हे बघ,मी सगळे खिळे काढलेसुद्धा..." त्यावर आई म्हणाली" हम्म ,पण मला सांग, तू खिळे काढल्यानंतर ठोकळा पूर्वीसारखा झालाय का रे?"मुलगा उत्तरला" आई ही  भोकं पडलीयेत बघ कशी? असा कसा पूर्वीसारखा होईल?" आई म्हणाली" हम्म,मग माणसाचं मनसुद्धा असाच असत..एखाद्या व्यक्तीला राग आला तर ती चिडून समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल,मन दुखावेल अस बोलू शकते. आणि मनावरची जखम ही या ठोकळ्यावरील भोकांसारखी असते. ती भरून येण तर अवघडच! राग आणि अपशब्द माणसाला घायाळ करतात आणि त्याच जगण भकास करून टाकतात." मुलाला आईच्या म्हणण्याचा मतितार्थ कळला. मुलगा संयमाने आणि प्रेमाने वागू लागला. त्याचा समजूतदारपणा वाढला.तो स्वतः सोबत इतरांना देखील आनंदी करण्याचा प्रयत्न करू लागला.          आजच्या दिवशी हि गोष्ट सांगण्याचं  प्रयोजन काय? तर व्हेलेंटाईन डे ..म्हणजे प्रेमाचा दिवस....आज बरीच मन जुळतील..काही दुखावतील सुद्धा...हो,ती किंवा तो नाही म्हणाला तर? रागावला तर?..राग करू नका समजून घ्या.कारण मनावरच्या जखमांवर औषध नसतं आणि काळ औषध म्हणून कमी पडतं.

कारण आज संत Valentinus साठी आपण हा दिवस साजरा करतो..चला. शांतता आणि प्रेम यांचा सुरेख मेळ साधत आनंदाने जगूया. ,२१व्या शतकात माणसामधल्या संतांचा आदर करूया!! happy valentine's day!!



Thursday, February 7, 2013

Sorry?



sorry  म्हणायचं का मी?
मी पुढाकार घेतला म्हणून?
मी प्रश्न विचारले म्हणून?
आणि तुम्ही निरुत्तर झालात म्हणून?

sorry म्हणायचं का मी?
मी सुरुवात केली म्हणून 
मी आनंद पसरविला म्हणून?
तुमच्या पोटात दुखाल म्हणून?
कधी नव्हे ते तुमच कर्तेपण हुकल म्हणून?

sorry म्हणायचं का मी?
मी तत्त्वाने वागले म्हणून?
मी मुद्द्याच बोलले म्हणून?
तुमचे मुखवटे ओरबाडले म्हणून?
आणि सत्य मांडलं म्हणून?

sorry म्हणायचं का मी?
मी बापू झाले नाही?
न कुणी विवेकी बाबा?
माझ्याच मंडळी पाहतो 
अविचारांचा फक्त ताबा?

sorry मंडळी; 
यासाठी 
कारण या 'sorry'ला खूप अर्थ आहे 
आणि तुमच्यासमोर त्याच्यासोबत शरण येण.. 
म्हणजे माझ असण व्यर्थ आहे.