Sunday, March 8, 2015
Saturday, January 17, 2015
अजनबी मुलाकात
मेहसूस करते थे हम
उस सेहमे से एहसास को..
बिखर सा गया था
अनकहासा कही वोह|
ना जाने कहाँसे
छा गयी अजनबीसी?
ना पहचान हैं..
जान उलझीं हुई सी..
ना दर्द मिलें
न ग़म का हों साया;
उनकी मुस्कुराहटोमे
था दिल ये समाया|
निगाहें न मिली
लफ़्ज़ हो गए लापता,
ख़्वाहिशें न रहीं
और बस्स.....
कर दिए अलविदा |
-पल्लवी
४/१/२०१५
Monday, October 27, 2014
दिवाली डाएट!
दिवाळीच्या खरेदीसाठी मी मैत्रिणीसोबत फेरफटका मारत होते. दिवाळीच्या चाहुलीने फुललेली बाजारपेठ आणि सगळ्यांच्या उत्साहाला आलेलं उधाण अशा दिवालीमय वातावरणात आमची तुफान खरेदी सुरु होती. दिवाळी म्हटलं कि खाद्यपदार्थ आले आणि अलीकडे जास्तीचा फराळ बरेचदा खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांकडून खरेदी केला जातो. आम्हीदेखील याला अपवाद नाही. मुंबईतील बाजारपेठांमध्ये अनेकविध दिव्यांसोबत पदार्थांचा घमघमाट सुटला होता.आम्ही आमच्या नेहमीच्या खवैय्या स्पेशल काकांच्या दुकानात गेलो रंगीबेरंगी मिठाई ,विविध सुक्यामेव्याने लगडलेले गोड पदार्थ विविधरंगी करंज्या, विविध धान्यांनी बनलेल्या चकल्या [या बाराही महिने उपलब्ध असतात म्हणा;पण दिवाळी विशेष :)]… खवय्यांसाठी दावतच जणू!
माझी मैत्रीण मला म्हणाली, "दिवाळीसाठी जेवढा 'वेट लॉस' केलाय न तेव्हढ पुन्हा 'गेन' होणार बघ माझं!" तेवढ्या शेजारच्या काकूंनी दुकानदाराला सांगितलं "शुगर-फ्री- लाडू द्या - बेसनाचे" ते ऐकून माझी मैत्रीणसुद्धा " वाह,सुगर -फ्री लाडू? घेऊ का मीपण?' तेवढाच गिल्ट-फ्री खाता येईल आणि वेट गेन ची भीती पण नाही व्हॉट से?" मी हसून सहमती दर्शविली आणि हिने दिमाखात अर्धा किलो 'शुगर- फ्री' लाडूच फर्मान सोडलं! "हो पण शुगर फ्री आहे म्हणून जास्तीचे लाडू खाल्लेस तर मात्र weight विल नॉट wait" "हो, तेपण आहेच" 'आय प्रॉमिस, इट्स माय दिवाली डाएट! '"मग अगदीच चालेल"त्यावर दोघीही हसलो. तिच्या या 'दिवाळी डाएट' संकल्पनेने माझ्यातल्या आहार-तज्ञाला विचार करायला भाग पडल नसेल तर नवल कसले?
आहार, डाएट हा खर तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणि तितक्याच कुतूहलाचा विषय! दिवाळीच्या सेलिब्रेशन मूडमध्ये हे डाएट जणू गायब होऊन जात आणि नंतर हिरमुसलेल्या चेहऱ्याने वजन-काट्याशी असणारं वैमनस्य डोकावू लागतं . दिवाळीचा फराळ ,विविध मिठाईचे प्रकार हे रोजच जेवण होऊ लागत . चंद्र कलेकलेने वाढतो तास वजन किलोकिलोने वाढू लागत. काय कराव बर नेमक? दिवाळीच्या दिवसात काय डाएट करावा ।कय आहार घ्यावा याबद्दल थोडेसे:
१. दिवाळीच्या फराळातील गोड पदार्थ सकाळी खावेत. उदा. लाडू , शंकरपाळे, अनारसे ।हो;शुगर-फ्री असले तरी!
२. जेवणानंतर लगेच गोड खाणे खाऊ नका त्यामुळे अतिरिक्त चरबी-संचय होण्याची शक्यता वाढते . आणि वजन देखील!
३. मुळात हे लक्षात घ्यायला हवे कि फराळ हे मुख्य जेवण नव्हे; ते दोन जेवनमधील खाण्याचा पर्याय होऊ शकतात. उदा. चकली, चिवडा
४. भरपेट फराळ खाण्यापेक्षा नेमके खा. अवाजवी खाणे टाळा.
५. पानी का काम सिर्फ पानीही करता हैं! भरपूर पाणी प्या; तहान लागण्याची वाट पाहू नका.
६. दिवाळीच्या निमित्ताने पोटावर अतिक्रमण दूर करण्यासाठी नियमित व्यायाम करा.
या दिवाळीत स्वस्थ रहा सुस्त नको! हि दिवाळी तुम्हाला आरोग्य आणि मन:शांती देवो हि सदिच्छा !
ता. क .: आता हे लिहिताना शुद्ध तुपातील सुक्यामेव्याचे मुगाचे लाडू खाते आहे. घरच्या फराळाचा आनंद'शुगर फ्री'ला कळत नाही. असो. :)
उशीरा पोस्ट केल्याबद्दल क्षमस्व!
हा लेख 'कलाविष्कार'ई दिवाळी अंकात प्रकाशित करण्यात आला आहे.
आपण कलाविष्कार, ई दिवाळी अंक, ऑक्टोबर - २०१४ ची मोफत प्रत खालील लिंकवर क्लिक करून मोफत डाऊनलोड करू शकता किंवा मोफत ओनलाईन वाचू ही शकता
Sunday, September 7, 2014
राष्ट्रीय पोषण आठवडा विशेष-२०१४
सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा भारतात 'राष्ट्रीय पोषण आठवडा' म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने गुगल-ए -आझम च्या या काळात आहार आणि पोषण तज्ञ या नात्याने काही 'पोषक-मूल्ये' मी माझ्या चेहरे-पुस्तक भिंतीवर लिहिली आहेत . समस्त ब्लॉगर मंडळींना माझ्याकडून छोटीशी भेट!
१. तुमचा दिवस 'फल'दायी जावो!
२. रोज १ वाटी पालेभाज्यांचे सेवन तुम्हाला खारट पदार्थांचे अतिसेवन करण्याच्या तीव्र इच्छेपासून थांबवू शकते.
३. पाण्याला चव नसते परंतु पाणी पिणे निरोगी आयुष्यासाठी अत्यावश्यक आहे; म्हणजे सगळेच पोषक पदार्थ बेचव असतात कि काय ? पण म्हटलंय ना," पाणी का काम तो पानीही करता हैं।" ;-)
४. जटील (तंतूयुक्त) कर्बोदके (complex carbohydrates) = सोपी पचनक्रिया!
५. दिवसभरात किमान एक चॉकलेट ही तुमची गरज असेल तर तुमच्या शरीराला सुक्या-मेव्याची गरज आहे हे लक्षात ठेवा.
६. बंद पाकिटातील मसालेदार चमचमीत खाद्यपदार्थांवर ताव मारून तुमचा वेळ छान जाईल; आणि नेहमीच्या जेवणात चिमूटभर घरगुती मसाल्यांचा वापर तुमचे आयुष्य छान आणि निरोगी करतील :)
७. रोज वापरल्या जाणाऱ्या साबण किंवा क्रीम्स किंवा चॉकलेट पेक्षा रोज २ ते ३ कप दूध किंवा ताजे दही किंवा ताक यांचे सेवन नक्कीच गुणकारी आहे.
-पल्लवी सावंत,
Wednesday, June 4, 2014
अशा एका संध्याकाळी
अशा एका संध्याकाळी

अशा एका संध्याकाळी
भेट व्हावी….
जेथे सूर्य असेल स्थिरावत
लयबद्ध सहजतेने
निरोप घेत……
जणू आपल्या डोळ्यासमोर विरून जातंय
सतावणार बरंच काही
अशाच एका संध्याकाळी …
निर्धास्त होऊन रमावं आपण
आपल्याच तरल स्वप्नात…
त्या पिवळसर केशरी अभ्रांच्या प्रकाशात
शमावं…
संपून जावं…
वादळ
या लाटांसोबत…
मात्र तू असायला हवंस
अशा सहज निरोपात
जिथे शांततेची भाषा
रुजत जाते
हलके हलके…….
-पल्लवी
०४।०६।२०१४

अशा एका संध्याकाळी
भेट व्हावी….
जेथे सूर्य असेल स्थिरावत
लयबद्ध सहजतेने
निरोप घेत……
जणू आपल्या डोळ्यासमोर विरून जातंय
सतावणार बरंच काही
अशाच एका संध्याकाळी …
निर्धास्त होऊन रमावं आपण
आपल्याच तरल स्वप्नात…
त्या पिवळसर केशरी अभ्रांच्या प्रकाशात
शमावं…
संपून जावं…
वादळ
या लाटांसोबत…
मात्र तू असायला हवंस
अशा सहज निरोपात
जिथे शांततेची भाषा
रुजत जाते
हलके हलके…….
-पल्लवी
०४।०६।२०१४
Subscribe to:
Posts (Atom)