Sunday, September 7, 2014

राष्ट्रीय पोषण आठवडा विशेष-२०१४

सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा  भारतात 'राष्ट्रीय पोषण आठवडा' म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने गुगल-ए -आझम च्या या काळात आहार आणि पोषण तज्ञ या नात्याने काही 'पोषक-मूल्ये' मी माझ्या चेहरे-पुस्तक भिंतीवर लिहिली आहेत . समस्त ब्लॉगर मंडळींना माझ्याकडून छोटीशी भेट!

१. तुमचा दिवस 'फल'दायी जावो!

२. रोज १ वाटी पालेभाज्यांचे सेवन तुम्हाला खारट पदार्थांचे अतिसेवन करण्याच्या तीव्र इच्छेपासून थांबवू शकते. 

३. पाण्याला चव नसते परंतु पाणी पिणे निरोगी आयुष्यासाठी अत्यावश्यक आहे; म्हणजे सगळेच पोषक पदार्थ बेचव असतात कि काय ? पण म्हटलंय ना," पाणी का काम तो पानीही करता हैं।" ;-)

४.  जटील (तंतूयुक्त) कर्बोदके (complex carbohydrates) = सोपी पचनक्रिया!

५. दिवसभरात किमान एक चॉकलेट ही  तुमची गरज  असेल तर तुमच्या शरीराला सुक्या-मेव्याची गरज आहे हे लक्षात ठेवा. 

६. बंद पाकिटातील  मसालेदार चमचमीत खाद्यपदार्थांवर ताव मारून तुमचा वेळ छान जाईल; आणि  नेहमीच्या जेवणात चिमूटभर घरगुती मसाल्यांचा वापर तुमचे आयुष्य छान आणि निरोगी करतील :)

७. रोज वापरल्या जाणाऱ्या साबण किंवा क्रीम्स किंवा चॉकलेट पेक्षा रोज २ ते ३ कप दूध किंवा ताजे दही किंवा ताक यांचे सेवन नक्कीच  गुणकारी आहे. 

-पल्लवी सावंत,

No comments:

Post a Comment