Wednesday, June 4, 2014

अशा एका संध्याकाळी

अशा एका संध्याकाळी



अशा एका संध्याकाळी
भेट व्हावी….
जेथे सूर्य असेल स्थिरावत
लयबद्ध सहजतेने
निरोप घेत……
जणू  आपल्या डोळ्यासमोर विरून जातंय
सतावणार बरंच काही

अशाच एका संध्याकाळी …
निर्धास्त होऊन रमावं आपण
आपल्याच तरल स्वप्नात…
त्या पिवळसर केशरी अभ्रांच्या प्रकाशात
शमावं…
संपून जावं…
वादळ
या लाटांसोबत…

मात्र तू असायला हवंस
अशा सहज निरोपात
जिथे शांततेची भाषा
रुजत जाते
हलके हलके…….

-पल्लवी
०४।०६।२०१४



No comments:

Post a Comment