Tuesday, August 13, 2013

आम्ही लिहीत नाही आता




आम्ही लिहीत नाही आता, 
फक्त 'लाईक' 'लाईक'करतो। 
शेवटी एखाद स्टेटस भावलं,
तर 'शेअर' वगैरे करतो। 

आम्ही लिहित नाही आता ,
आलाय रायटर्स ब्लॉक। 
विचारांचा वेग भन्नाट, 
पण थांबतच नाही क्लॉक। 

आम्ही लिहित नाही आता, 
शब्द पेंगुळलेत जणू सारे।
मी अक्षरांना म्हणते,
असे रुसू नका रे!!

आम्ही लिहित नाही आता…… 
मन झालंय कोरड; 
हरवलाय भावनिक ओलावा,
एक हुंदका अस्फुट, 
मात्र स्वतःतच झुरावा… ।

4 comments:

  1. everything is in Marathi or hindi Pals :(
    I'm trying hard but I'm not getting it.... phew

    ReplyDelete
  2. सुंदर विषय हाताळलाय .
    आपली शब्दसंपदा,विवेक,सृजनशीलता आणि विषयाचा अंतर्नाद आसाच चिरंतन अनुभवयास
    मिळावा !
    निश्चितपाने लोकांनी लिहायलाच हवे हे ctrl c & ctrl v काय कामाचे ……

    ReplyDelete
    Replies
    1. रुपेश, ब्लॉगवर स्वागत!

      Delete
  3. सुरेख शब्दरचना , आणि वास्तवातले सत्य , खूप छान

    ReplyDelete