Wednesday, December 21, 2011

एक तरल अनुभव...

              थंडीचे दिवस...सकाळी बाहेर पडून धूसर वातावरणात चालत राहावं.. Morning  walk  च्या निमित्ताने बाहेर पडलेल्यांचा अशा वेळी सगळ्यात जास्त हेवा वाटतो. आपल्याच धुंदीत चालणारे..गाणी म्हणत चालणारे......सगळ्यांचाच! कुठे तरुणाईचे health groups आणि नियमित laughter club मध्ये धम्माल करणारे... कामावर जाताना वाफाळलेल्या चहाचे कप आणि गरम पोह्यांचा आस्वाद घेणारे....सगळेच गुलाबी बातावारणात स्वतःचा एक वेगळा  ठसा उमटवत असतात... अगदी वर्तमानपत्रात गायब झालेला विक्रेतासुद्धा!!  
             प्रत्येक स्थानकादरम्यान रंग बदलत जाणार आकाश! जांभळ ,लाल,गडद लाल,नारिंगी आणि पिवळ....हवेहवेस वाटणारे उबदार सूर्यकिरण असा काही स्पर्श करून जातात कि वाटावं सुरुवातच झकास झाली! सार काही अनुभवायलाच हव इतक अस्सल आणि तरल... चोहोदिशनी झोंबणारा सुखद वर आणि त्यात उगवलेला सूर्यतारा! त्याचं निर्मल अस्तित्व बिंबून जात... आणि मग पक्ष्यांचे उडणारे थवे ठळकपणे दिसू लागतात.प्रसन्न किलबिलाटाने तो क्षण खऱ्या अर्थाने रम्य ठरतो!
              खर तर लहानपणापासून हे क्षण आजीच्या गोष्टीतून,बालकथांमधून,छोट्या छोट्या कवितांमधून नंतर शालेय निबंधांमधून, ललित  साहित्य आणि पुस्तकांमधून आपण वेचत असतोच...पण या स्वछंदी आगमनाची आणि निसर्गाच्या कुंचल्याची किमया अनुभवताना  आणि त्याच्या छायेत वावरणार माणसाचं अस्तित्व पाहतानाची जादू निराळीच आहे! अशावेळी अविरत कष्ट करणाऱ्याचा शीण पळून  नव्या उमेदीने आरंभ होत नसेल  तर नवलच !!!!! 

No comments:

Post a Comment