दिवाळीच्या खरेदीसाठी मी मैत्रिणीसोबत फेरफटका मारत होते. दिवाळीच्या चाहुलीने फुललेली बाजारपेठ आणि सगळ्यांच्या उत्साहाला आलेलं उधाण अशा दिवालीमय वातावरणात आमची तुफान खरेदी सुरु होती. दिवाळी म्हटलं कि खाद्यपदार्थ आले आणि अलीकडे जास्तीचा फराळ बरेचदा खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांकडून खरेदी केला जातो. आम्हीदेखील याला अपवाद नाही. मुंबईतील बाजारपेठांमध्ये अनेकविध दिव्यांसोबत पदार्थांचा घमघमाट सुटला होता.आम्ही आमच्या नेहमीच्या खवैय्या स्पेशल काकांच्या दुकानात गेलो रंगीबेरंगी मिठाई ,विविध सुक्यामेव्याने लगडलेले गोड पदार्थ विविधरंगी करंज्या, विविध धान्यांनी बनलेल्या चकल्या [या बाराही महिने उपलब्ध असतात म्हणा;पण दिवाळी विशेष :)]… खवय्यांसाठी दावतच जणू!
माझी मैत्रीण मला म्हणाली, "दिवाळीसाठी जेवढा 'वेट लॉस' केलाय न तेव्हढ पुन्हा 'गेन' होणार बघ माझं!" तेवढ्या शेजारच्या काकूंनी दुकानदाराला सांगितलं "शुगर-फ्री- लाडू द्या - बेसनाचे" ते ऐकून माझी मैत्रीणसुद्धा " वाह,सुगर -फ्री लाडू? घेऊ का मीपण?' तेवढाच गिल्ट-फ्री खाता येईल आणि वेट गेन ची भीती पण नाही व्हॉट से?" मी हसून सहमती दर्शविली आणि हिने दिमाखात अर्धा किलो 'शुगर- फ्री' लाडूच फर्मान सोडलं! "हो पण शुगर फ्री आहे म्हणून जास्तीचे लाडू खाल्लेस तर मात्र weight विल नॉट wait" "हो, तेपण आहेच" 'आय प्रॉमिस, इट्स माय दिवाली डाएट! '"मग अगदीच चालेल"त्यावर दोघीही हसलो. तिच्या या 'दिवाळी डाएट' संकल्पनेने माझ्यातल्या आहार-तज्ञाला विचार करायला भाग पडल नसेल तर नवल कसले?
आहार, डाएट हा खर तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणि तितक्याच कुतूहलाचा विषय! दिवाळीच्या सेलिब्रेशन मूडमध्ये हे डाएट जणू गायब होऊन जात आणि नंतर हिरमुसलेल्या चेहऱ्याने वजन-काट्याशी असणारं वैमनस्य डोकावू लागतं . दिवाळीचा फराळ ,विविध मिठाईचे प्रकार हे रोजच जेवण होऊ लागत . चंद्र कलेकलेने वाढतो तास वजन किलोकिलोने वाढू लागत. काय कराव बर नेमक? दिवाळीच्या दिवसात काय डाएट करावा ।कय आहार घ्यावा याबद्दल थोडेसे:
१. दिवाळीच्या फराळातील गोड पदार्थ सकाळी खावेत. उदा. लाडू , शंकरपाळे, अनारसे ।हो;शुगर-फ्री असले तरी!
२. जेवणानंतर लगेच गोड खाणे खाऊ नका त्यामुळे अतिरिक्त चरबी-संचय होण्याची शक्यता वाढते . आणि वजन देखील!
३. मुळात हे लक्षात घ्यायला हवे कि फराळ हे मुख्य जेवण नव्हे; ते दोन जेवनमधील खाण्याचा पर्याय होऊ शकतात. उदा. चकली, चिवडा
४. भरपेट फराळ खाण्यापेक्षा नेमके खा. अवाजवी खाणे टाळा.
५. पानी का काम सिर्फ पानीही करता हैं! भरपूर पाणी प्या; तहान लागण्याची वाट पाहू नका.
६. दिवाळीच्या निमित्ताने पोटावर अतिक्रमण दूर करण्यासाठी नियमित व्यायाम करा.
या दिवाळीत स्वस्थ रहा सुस्त नको! हि दिवाळी तुम्हाला आरोग्य आणि मन:शांती देवो हि सदिच्छा !
ता. क .: आता हे लिहिताना शुद्ध तुपातील सुक्यामेव्याचे मुगाचे लाडू खाते आहे. घरच्या फराळाचा आनंद'शुगर फ्री'ला कळत नाही. असो. :)
उशीरा पोस्ट केल्याबद्दल क्षमस्व!
हा लेख 'कलाविष्कार'ई दिवाळी अंकात प्रकाशित करण्यात आला आहे.
आपण कलाविष्कार, ई दिवाळी अंक, ऑक्टोबर - २०१४ ची मोफत प्रत खालील लिंकवर क्लिक करून मोफत डाऊनलोड करू शकता किंवा मोफत ओनलाईन वाचू ही शकता