ऋजुता दिवेकर
फिटनेस आणि आहार वर्तुळातील प्रथितयश व्यक्तिमत्त्व.. भारतातील आघाडीची आहारतज्ञ शिवाय DON'T LOSE YOUR MIND LOSE YOUR WEIGHT आणि WOMEN AND WEIGHT LOSS TAMASHA या दोन सर्वाधिक वाचक लाभलेल्या पुस्तकांची लेखिका!आहार नियमन आणि पोषणशास्त्र या विषयातील किचकट संज्ञा अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगण्याची हातोटी,आणि या विषयातील त्याचं सखोल ज्ञान त्यांची पुस्तक वाचताना अधोरेखित होत. 'इट लोकल थिंक ग्लोबल' हा त्यांच्या पुस्तकातील संदेश बराच सांगून जाणारा आहे.
याच विषयाची विद्यार्थिनी म्हणून मला त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळावी असा विचार करत असतानाच २० ऑक्टोबर २०१२ रोजी त्यांच्या 'pay as you like a day' या उपक्रमा अंतर्गत मला हि संधी मिळाली.
हा उपक्रम सेवादायी संस्थेसाठी केला जात होता हे या उपक्रमाचे विशेष!(तुम्ही स्वखुशीने देऊ केलेली रक्कम सेवादायी संस्थेला देण्यात येणार होती).शिवाय हा उपक्रम नेटक्या पद्धतीने राबविण्यात आला.
समाजात आहारविषयक सजग आणि डोळस जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांचे हे पाऊल नक्कीच स्तुत्य म्हणावे लागेल.
त्यांच्या आहारविषयक मतांची यानिमित्ताने प्रत्यक्ष ओळख झाली. त्यांच्या कार्यालयात दुपारी ३ वाजता माझी appointment होती आणि मी पावणे तीन च्या सुमारास त्यांच्या कार्यालयात पोहोचले.
माझ्याआधीचे consultation सुरु असल्यामुळे मी थांबले होते.
त्यादरम्यान एका वयस्क बाईंशी माझी स्मितहास्याने ओळख झाली. त्यांनी माझ्याकडे पाहून मला विचारलं;
बाई : आप?
मी: मै ऋजुता मैम के सेशन के लिए आई हू|
बाई: अच्छा,लेकिन आप तो काफी दुबले हो;आप को क्या जरूरत है वजन घटाने की ?..
मी: (आहार तज्ञ म्हणजे वजन घटविणे हा समज किती दृढ आहे) मुझे फिटनेस बढ़ाना है..
बाई: हाँ लेकिन यह बहोत expensive है .. मैंने बहोत साडी dietician देखी है,डाइट फॉलो किया है..इनकी भी बुक पढ़ी है..जैसे लिखा है ; वैसेही फॉलो कर रही हूँ...मुझे अभी पूछना है ..यह है क्या? कैसे करना है ..लेकिन इसका फीज बहोत है..
मी: लेकिन aunty वोह इतनी परफेक्ट गाइड करती है ...और यह तो चैरिटी के लिए सेशन है...
बाई: हाँ फिर भी..
मी: और अभी जो बुक्स available है वोह इतने technicle भाषामे लिखी हुई है..रुजुता के बुक्स ऐसे नहीं है ...इतनी आसान भाषा में डाइट की परिभाषा बहोत कम बुक्स में है ..
बाई: मैंने दोनों बुक्स पढ़े है..आसान भाषा है यह बात तो सही है..फिर भी..
मी: आप गुजराथी हो?( मराठमोळ मन सॉरी :)
बाई:(बाईंनी सहमतीदर्शक मान डोलावली) और आप?
मी: महाराष्ट्रीयन!
बाई: आप क्या करते हो?
मी: मै nutrition स्टूडेंट हूँ
बाई: अच्छा..
आमच संभाषण सुरु असतानाच आम्हाला आत बोलावण्यात आलं..३ वाजले होते.. ऑफिसमध्ये प्रसन्न आणि शांत वातावरण होत. प्रवेश केल्या केल्या हातात सूप घेऊन उभी असणाऱ्या स्त्रीची मूर्ती होती..आणि विशेष म्हणजे सुपात तांदूळ होते..:) 'डाएट'बद्दलचा तुमचा पहिला धडा..तांदूळ/भात खाणे वर्ज्य नाही!!
मराठीत एक उक्ती आहे;'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले!'ऋजुता दिवेकर यांच्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडते.
इतक्यात आतील खोलीतून ऋजुता बाहेर आल्या आणि त्यांनी स्मितहास्याने स्वागत केल..जितक्या सहजतेने त्यांच्या पुस्तकात आहार नियमनाबद्दल लिहिलंय तितक्याच सहजतेने त्यांची टीम तुमच्याशी संवाद साधायला सुरुवात करते. आहारातील छोट्या छोट्या गोष्टी,खाण्याचे नियम समजावत असतानाच 'योग्य वेळी योग्य तेच योग्य प्रमाणात खाण' याच महत्त्व पटत जात. आहारतज्ञ समोर बसली आहे म्हणून दुजाभाव नाही किंवा हे काहीतरी मोठ्ठ आहे याचा लवलेश नाही. ऋजुताची आहारतज्ञ सौम्या संयमाने माझ बोलण ऐकत होती आणि आहाराबद्दलच्या माझ्या प्रश्नांना उत्तरदेखील देत होती.मला आहारशास्त्रातील काही नियम नव्याने कळले होते. बरोबर ४५ मिनिटांनी माझ सेशन पूर्ण झालं.
नंतर पुन्हा एकदा गुजराथी बाईंची आणि माझी भेट झाली. त्यांचा चेहरा उत्साहाने फुलला होता.
"कैसा था सेशन?" मी विचारलं. हाताने खुणावत १८० अंशात हसत त्यांनी उत्तर दिल "एकदम बेष्ट!" यातच ऋजुता आणि त्यांची टीम जिंकते अस मला वाटून गेलं.त्याचं शिक्षण तुम्हाला नवी ऊर्जा देऊन जात.
माझी मैत्रीण मी ऋजुता दिवेकर यांच्या सेशन साठी जाणार आहे हे ऐकून मला म्हणाली होती,"स्वतः आहार तज्ञ असताना काय गरज आहे जायची?" माझ उत्तर होत," शिकायला मिळत ग" त्यावर तीच उत्तर होत,"अस सगळ खाऊन काही होत नसतं; गिमिक आहे;का वेळ वाया घालवतेस उगाच! फसवणूक तुझी आणि त्यांचीपण[कारण मी आहारतज्ञ!] "(जर हे ती वाचत असेल तर मला आवर्जून सांगायचं, सगळ व्यवस्थित खाल्लं तर बरंच काही होऊ शकेल यावरचा माझा विश्वास द्विगुणीत झालाय आता)
ऋजुता दिवेकरांच्या आहार नियमन आणि फिटनेस याबाबतच्या चतु:सूत्री अंमलात आणून (मस्त खा)स्वस्थ राहा! गुजराथी आजींच्या भाषेत सांगायचं झाल तर"एकदम बेष्ट!"
ता.क.: ऋजुता दिवेकर यांच्या पुस्तकात मसाला चहा चा उल्लेख अनेकदा केला गेलाय. मी "हा वेगळा चहा आहे का?" अशी विचारणा करता मला खरंच तो चहा दिला गेला.
पारंपरिक पद्धतीने बनवलेला उत्तम चहा मी चाखलाय! :)
मग आता आम्ही तुझं सेशन बुक करायचं का???
ReplyDeleteअपर्णा, नक्की:)
ReplyDelete