१३.
पाऊस म्हटलं कि मला आठवत आम्ही सगळी भावंड लहानपणी एकत्र येऊन वाड्यामागच्या तळ्यावर जायचो घरातील कागद घेऊन.. होड्या बनवायचो.. आणि मस्त खेळायचो पावसात...
एकदा तर दादांची (आमच्या आजोबांची) छत्री घेऊन तीत पाणी भरून होड्या गोल गोल फिरवत बसलो होतो काय ओरडा खाल्लाय..अर्थात आऊ साहेबांचा! आणि गम्मत म्हणजे दुसऱ्या दिवशी दादा स्वतःच आले आणि आम्हाला त्यांची छत्री देऊन म्हणाल," भरपूर धमाल करा पठ्ठ्यानो.. हेच दिवस उलट्या छत्रीत पाऊस साठवायचे...कित्ती खूष झाले होते मी आता मोठ झाल्यावर दादाचं बोलण उमगतंय मला...तेच दिवस उलट्या छत्रीत पाऊस साठवायचे..
१४.
अलीकडे फक्त गाडीतून पाऊस भेटतो तितकाच..बरेच दिवसात मनसोक्त भिजलो नाहीये पावसात..आयुष्य काय सिनेमातल्यासारख असतं होय? त्या जब वी मेट मध्ये शाहीद आणि करीना काय सुंदर नाचतात ग पावसात? मी गाडी थांबली कि त्या पावसात त्या दोघांना पाहतो आणि गाडीतून बाहेर पडून त्यांच्यासोबत नाचत राहतो...बराच वेळ....पाऊस..असा अलिप्त आणि पांढरपेशा झालाय आताशा..माझ्यासाठी
१५.
बारिश आयी तो मालक बहोत डाटता है| "रास्ता ख़राब हो तो कैसेभी करके बनाओ बनाओ" कहता रहता है.. "रात दिन मर मर के काम शुरू करो और ऐसे करो की फिर से रास्ता बनाना पड़े अगली बारिश में| बहोत बार दिल किया इसका असली चेहरा दुनिया के सामने लाऊ..बतादू सबको माल में बहोत गफला करता है..और बारिश को गलद ठहराता है.. मै तो बारिश का दीवाना हूँ और ये उसीको गलाद कहता है...बदमाश.. लेकिन मै तो ज्यादा पढ़ा लिखा हूँ नहीं|
लेकिन एक बात अच्छी है बारिश दूध का दूध और पानी का पानी कर देती है !
१६.
पाऊस म्हणजे..अस कस सांगणार..पाऊस म्हणजे ओह्ह नो..हा बघ पाऊस असा कोसळायला हवा पाऊस..पाऊस आहाहाहा याला म्हणतात पाऊस... मी बघतच राहिले..
अलीकडे मी नुसत पाऊस म्हटलं तरी पाऊस पडतो..अगं खरच ( असं लूक देऊ नको..) मलाच आश्चर्य वाटायला लागलंय! त्याला कळलं असाव बहुधा.. आपल अस बरसन कोणालातरी इतक सुखावून जात.. वेडा पाऊस!
१७.
पाऊस म्हटलं कि मला आठवतो श्रावण गं! आम्ही सगळ्याजणी मिळवून इतके खेळ खेळायचो..सोबत पाऊस असेच. खास कोणाचं तरी घरच बुक करून टाकायचो... आताच्या नव्या मुलीपण हौशी आहेत गं...कालच कमल मला म्हणाली सुनेची मंगळागौर आहे म्हणून...सगळ पुन्हा आठवलं काय दिवस होते मी तर इतक्या हिरीरीने गाणी म्हणायचे,आणि खेळायचे...(इथे आजीच खट्याळ हसण)
मला आठवत एकदा अश्याच फुगड्या रंगल्या होतं आणि तुझे मामा आजोबा त्यांनी कुठूनसा प्लास्टिकचा साप सोडला आमच्यात... रेखाची..तुझी मावशीआज्जी गं.. अशी बोबडी वळली की विचारू नको...बर बाहेर तर पाऊस..जाणार कुठे वेडी? सगळ्यांची हसून हसून पुरेवाट..झाली होती..त्याला नेहमीच खोड होती अस काहीतरी करत रहायची आणि रेखा नवी त्यावर्षी (आज्जी अशीच काय काय सांगत राहिली आणि मी बाहेरचा झिम्माड पाऊस पाहण्यात तिच्या आठवणीत बुडून गेले)
१७.
मला पाऊस म्हटलं कि अभिराजने तयार केलेली होडी आठवते.एकदा मस्त रात्रभर पाऊस कोसळला होतं आणि हा पठ्ठ्या मला जोर जोरात हाक मारत होता ताई तायडे ताई,लौक्कर बाहेर ये!
हा बघ पाऊस.. आणि हे बघ मी काय बनवलाय...मी जाऊन पाहिलं तर हे महाशय मस्त साचलेल्या पाण्यात होडी सोडत टाळ्या वाजवत होते..मला गम्मतच वाटली त्याची! आणि थोड्या वेळाने लक्षात आलं या माणसाने माझीच कोरी वही वापरली होती होडीसाठी!! मग सगळा गोंधळ आणि भांडण..रडारड. सगळ साग्रसंगीत साजर झालं. अभिला कळेच ना त्याच काय चुकलंय.. मग आऊसाहेबांनी समजूत काढली. आणि माझा छोटा भावडा बिचारा..एवढास तोंड झालं त्याचं! मी रडून धुमाकूळ घातला होता. मी आधी घुश्श्यातच होते.एकटीच बसले होते;त्याच्याशी काहीच न बोलता! तर मला म्हणतो,"तायडे, ही घे तुजी वही! मला नको ती.. पुन्हा होडी करणार नाही. सॉरी मी डोळ्याच्या कोपऱ्यातूनच पाहिलं.. तर त्याने सगळ्या होड्या सोडवून कागद पुन्हा सरळ केलेले मला इतकं हसू आलं त्याचा वेडेपणा पाहून! त्याला तसाच घेऊन मी बाहेर गेले..मस्त पाऊस पडत होता..म्हटलं "चल, होड्या बनवूया!".दोघांची दोन मिनिटात बट्टी झाली. असा वेडा पाऊस आणि माझा वेडा भावडा आणि मी!
१८.
माझा पाऊस म्हणजे कर्नाळ्यापर्यंतचा रम्य प्रवास! बस मध्ये मस्त गाण्यांच्या भेंड्या सुरु होत्या. आणि मी बाहेर कोसळणाऱ्या पावसात गुंतून राहिले होते.. धुवांधार पावसात रमण म्हणजे काय ते अनुभवत होते. रस्त्यावर दाटलेलं धुकं तेही पावसात! आणि हाय :) ते इंद्रधनुष्य! मी माझी नव्हतेच जणू.. त्या पावसाचीच होऊन गेले होते. तेव्हापासून मला पाऊस जास्तच आवडतो. रम्य पाऊस!
१९.
पाऊस म्हटलं की मला आठवत माझ गाव! गावच्या घरामागची संथ वाहणारी नदी आणि त्या नदीकिनारी बहरलेलं माझ बालपण! पावसात नदी नेहमीच वेगळी दिसत असे. मला वाटायचं पाऊस या नदीपासून सुरु होतो आणि हिच्यावरच संपतो...नंतर विज्ञान शिकताना समजलं समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन नंतर पाऊस पडतो...तेव्हा वाटल आपली नदी सुद्धा साद देत असेलच आभाळाला! उगीच नाही आपल्याला भावत नदीकाठचा पाऊस! असं वाटत या नदीमध्ये आपणही विलीन होऊन जावं. मुंबईत सगळे एकतर मरीनलाईन्स च्या किनाऱ्यावर पाऊस एन्जॉय करतात किंवा घरात बसून खिडकीतून पाऊस अनुभवतात. पण ते निसर्गाशी एकरूप होण मी,माझा पाऊस आणि माझी नदीच जाणो!
२०.
ओह माय गॉंड पाऊस. तुला माहितेय मी बॉय'ज हॉस्टेल मध्ये राहायचो तेव्हा माझा एक मित्र होता वेदांत..इतकी छान गिटार वाजवायचा तो! कॉलेजचा रॉकस्टार होता तो...पाऊस असला कि तो इतका तल्लीन होऊन वाजवत असे कि असं वाटायचं याच हे संगीत कधी संपूच नये. त्याच्या भोवताली सदानकदा मुलींचा गराडा असे. पण याने कधी शायनिंग मारलेली नाही. एकदम वल्ली माणूस! फक्त खोलीत आला कि मिश्कील चेहरा! आमचा रूम मते अमेय मस्त गाणी लिहायचा आणि गायचासुद्धा!
पाऊस सुरु झाला की हे दोघे सुरु!हा मस्त गिटार घेऊन बसायचा..थोड्या वेळाने अमेयची गाणी..पाऊस संपेपर्यंत तेच! अगदी रात्री २-३ वाजले! त्याची गिटारची धून, अमेयचा आवाज,गाणी आणि तो पाऊस बास्स!
आता सगळे बिझी असतात.फारसं भेटणही होत नाही. कधीतरी फोन, इंटरनेट इतकंच! अमेय पुण्याला असतो आणि वेदांत गोव्याला! पण पाऊस असला की मी फार मिस करतो त्यांना!
त्याच ड्रंग डिंग.. म्युझिकल रेन यु नो...
ता. क. पाऊस असाच भिजवत राहणार! तुम्हाला, मला नवे नवे अनुभव देत राहणार जुन्या आठवणींना स्वतःसोबत घेउन येणार ..तुमच्या पावसात मनसोक्त भिजत रहा..नव्याने (क्रमश :).
Chaan aahet pausabaddalache tujhe anubhav....
ReplyDeleteहम्म:)
Deleteएकंदरीत सगळं पाऊसमय झालंय तर...:)
ReplyDeleteहो ग! :)
Deleteye bhi avadya :)
ReplyDeletezakas ekdam :)
:)
Deleteawesome.................
ReplyDeleteGajanan,welcome to blog and thank you :)
Deletechan ahe lekh
ReplyDelete:)aabhar!!
Delete