Wednesday, March 28, 2012

प.सा.रा.

अगं  किती  हा  पसारा  तुझा? … आवर  तरी  तो …
कित्ती  पसारा  करतेस  तू?
आवडतं  का  तुला  असं  पसाऱ्यात बसायला ? एक  ना दोन  … प्रत्येक  वेळी  हे  असं  काहीतरी  ऐकाव  लागतंच.
         असाच  एकदा  सगळ  आवरून  so called पसारा ..काम  करत  बसले . नंतर  जाणवू लागलं काहीतरी कमी आहे यार   …काय   तेच  नेमक  कळेना …अरे  हो …ते  पुस्तक  वाचायचं  राहिलंय  खर..एक पुस्तक  बाहेर  काढलं.. तेवढ्यात  आठवल  ओह 'पोरवय'  किती  दिवसात  वाचल  नाहीये .. ते सुद्धा शेजारी  ठेवलं  पुन्हा  वाचन  सुरु!! वाचता वाचता  एक  सुंदर  वाक्य  वाचलं…किती  छान विचार  आहे  . लिहून  ठेवायला हवा …..
आणि  कप्प्यातील  वही  काढली;  हि  नको  ती  नको  finally माझी  आवडती  वही  मिळाली ..आणि  त्यात  लिहायला   सुरुवात  केली …… आई  बाहेर  आली  आणि  ‘अगं  काय  हे  पुन्हा   तेच ? किती पुस्तक  मांडून ठेवली  आहेस   स्वतःभोवती  ….Ooops…. मीपण  थोडावेळ  बघत  बसले  पाहता  पाहता  काय  काय  मांडून  बसले  होते  मी …पण  छान  वाटत  होत  त्या  तशा  पसाऱ्यात बसायला ! एक  वेगळीच  मजा  येत  होती . कसली  माहित  नाही  पण  आवडत  होत  ते  पुस्तकाचं , पेन ,वही  याचं  आजूबाजूला असण…..
          असाच  विचार  करता  करता  लक्षात  आल .. हं, हे  असं  बसाल  तर  खरी  गम्मत आहे. या  वहीच्या  पानात …बराच  काही  दडलेलं  आहे ….माझं स्वतःच  सगळ  काही …..हे  असं  माझ्या  जगाच्या  गराड्यात  बसलेलं  आवडतंय … एका  लेखकच  लेखन  इतक  स्पर्शून  जातंय  कि ते  पुस्तक  वाचून  पूर्ण  झाल्याशिवाय  बर  वाटत  नाहीये . किती  किती  काय  काय  विचार  मनात  येत  होते …. पसाऱ्यात असाल  कि  वाटत  बॉस.. something is going on…एका वेगळ्या वलयात  बसलो  आहोत  आपण  आपल्याभोवती  हे  सुंदर जग मस्त  फेर  धरून  नाचतंय  आपल्याभोवती  सगळ  भवताल  वेगळ  झाली  आपलं......त्यात  रममाण  होऊन  गेलो  आहोत  आपण! आणि  हे  क्षण  कोणीही  हिरावून  घेऊ  शकत नाहीये  माझ्यापासून! माझे  स्वतःचे  मी जपलेले क्षण …..
         अचानक  कधी  कधी  याच  पसाऱ्यात  मला   माझं बालपण  भेटतंय तर  कधी  अल्लड  मैत्रीचे  क्षण … एखादी  वही   शोधता  शोधता  अचानक  ग्रीटिंग  कार्ड  सापडत  तर  कधी  अचानक   कोणी  भेट  दिलेलं  टूर गाईड …,पेन ,बुकमार्क ,अर्धी जाळी जमलेलं पिंपळपान…कुठूनतरी  मिळवलेल  मोरपीस ,जून  शाईपेन ….एखाद महागड  पेन …आणि  बरंच काही ……
एखादी  गोष्ट  करण्यासाठी  तशी  वातावरणनिर्मिती  व्हायला  हवी …आणि  हे  काम  आहे  या पसाऱ्याच….
        मुळात  पसारा  नाहीच  आहे  तो …ते  जग  आहे  भारलेलं…..एका  अनामिक  उर्जेने  ताज  टवटवीत  झालेलं ….ज्यात  फक्त  आणि  फक्त  निखळ  आनंद  आहे  दुसर काहीच  नाही . पुस्तक   वाचण्याचा  आनंद  वेगळा  आणि  पसार्यात   बसलेल  असताना  जपून  ठेवलेला  एखाद्या  अत्यंत  आवडत्या  लेखकाचे  सगळे  लेख  एकत्र  केलेला  संच  सापडला  कि जो  आनंद  होतो  तो  ज्याला  संच  सापडला  आहे  तोच  जाणो! आणि मग  त्यावेळी  त्यातला  एखादा  लेख  वाचल्याशिवाय राहवतच  नाही ….
एकदा  तर  असेच  चतुरा-मराठी पाक्षिकाचे  निवडक  अंक  जपुन ठेवलेले आढळले  …. कप्पा  लावण्याच्या  निमित्ताने  ७-८ वर्षापूर्वीचा    वृत्तपत्र -साहित्याचा  अमाप  खजिना  हाती  लागला  होता…वेगवेगळ्या  कथा ..लेख,कविता ,ललित  सगळी  मेजवानीच!….कप्पा  लावण  बाजूलाच  राहिलं  आणि  त्या  लेखांच्या  जादुई  दुनियेत  अशी  काही  बुडून  गेले ....…की भानच राहिलं नाही!!
एवढ्यात  आईची  हक  ऐकू  आली ,'' आज  संपणार  आहे  का  ग ? कि  सगळ  आजच  वाचणार आहेस  ? जरा  पसारा  आवर  म्हटलं  तर …तुझं  आपल  भलतंच….
 पेपर्स ,पुस्तक ,अंक  यांनी  मला  चोहीकडून  घेरल  होतं. चेहऱ्यावर  मस्त  समाधान  आणि  आश्चर्याच  'खुदकन'वाल  खट्याळ हसू  होत …कारण  हे  माझं जग  होत …किती  दिवसांनी  अशी  मस्त  कागदी  गराड्यात  बसले  होते ..त्यात  काय नव्हत? माझे लाडके लेखक- कवी, त्यांचे लेख,कविता  शिक्षकांच्या आठवणी ..मित्रमंडळी  होती ,शाळा …खेळ ….उन ,पाउस सगळ  एका  ठिकाणी  त्या  'पसाऱ्यात'..
      मुळात  प.सा.रा.  म्हणजे :परिपक्व स्वसंवादाचा  राजाश्रय …भन्नाट  वेड लावणारं आणि  तितकाच  निखळ विश्व ….. एखाद्या  निरागस बाळाइतक,आणि  स्वच्छं  आकाशासारख 
अप्रत्यक्षपणे  अल्लद  आपल्या  मनाच्या  गाभारयातले  रंग ओघाळवणार जग ……..आठवणींचा  कोलाज  तयार  करणारा  पसारा …मला  आवडतो  तुमच  काय ?
तुम्हाला  कोणत्या  पसाऱ्यात रमायला  आवडत?

Monday, February 27, 2012

माझ्या मराठीची बोलु कौतुके परि अमृतातेही पैजा जिंके !!!!!

कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारी मराठी जपणाऱ्या प्रत्येकास  मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!




Monday, February 20, 2012

पक्ष्यांची साद




पक्षी ..... अगदी लहानपणापासून पक्ष्यांबद्दल  प्रत्येकाला   कुतूहल असत!
अगदी खातानासुद्धा हा घास काऊचा हा घास चिऊचा अशी आपल्याही नकळत पक्ष्यांशी ओळख होऊ लागलेली असते. जस जसे मोठे होऊ लागतो तसे या पक्षीप्रेमाला निरनिराळे अर्थ प्राप्त होतात..कधी कवितेतून तर कधी निरनिराळ्या रूपकातून मानवी स्वभावाचे कंगोरे रेखाटणारे..अशा अनेक रुपात पक्ष्यांची ओळख होत राहते. 
निरनिराळ्या पक्ष्यांच्या दुनियेत रममाण व्हायला कोणाला आवडत नाही? पण जर हे पक्षीप्रेम आणखी व्यापक होऊ पाहत असेल तर... याच कल्पनेतून उदयाला आला आहे जोगेश्वरीच्या इस्माईल युसुफ कॉलेज चा ORNITHOLOGY CLUB ! 

मुंबईत इस्माईल युसुफ महाविद्यालयात Ornithology Club २००९पसुन कार्यरत आहे.
डॉ. आनंद पेंढारकर यांनी या क्लबचे उदघाटन करण्यात आले होते. २००९ पासून क्लब अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात आले. पक्षीनिरीक्षण हा त्यातील महत्त्वाचा उपक्रम! आतापर्यंत क्लब च्या सदस्यांना B.N.H.S.,WWF या संस्थांमधील नामवंत अभ्यासकांचे मार्गदर्शन लाभले आहे. श्री. सौरभ सावंत, डॉ. लट्टू ,श्री. पिनाकिन कर्वे, श्री. मयुरेश खटावकर,श्री. पर्वेश पंड्या  यांसारख्या अभ्यासकांनी आणि पक्शिनिरीक्षकानी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांचे पक्ष्यांबद्दलचे कुतूहल अभ्यासू वृत्तीत बदलण्यास हातभार लावला आहे.
प्रा. मनीषा कुलकर्णी, प्रा. स्वप्नेश रांगणेकर यांचा या क्लब च्या जडण घडणीत महत्त्वाचा वाटा  आहे.
दरवर्षी क्लब तर्फे नवे नवे उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांनी  त्यांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलेल्या  विविध पक्ष्यांचे प्रदर्शादेखील भरविण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या ६० एकर campus मध्ये पक्षिवैविध्य आढळून येते. या पक्षांच्या निरीक्षनासोबातच त्यांच्या संवर्धनासाठी जागरूक राहणे महत्त्वाचे आहे.
केवळ महाविद्यालायातीलाच नव्हे तर विद्यार्थ्यांना विविध प्रदेशातील पक्ष्याची ओळख व्हावी यासाठी महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातर्फे ornithology club अंतर्गत  अनेक अभ्यास-सहलींचे आयोजन केले जाते. या club  मुळे अनेक विद्यार्थी पक्षीनिरीक्षण आणि पक्षिसंवर्धन यात  सक्रीय झाले आहेत. 
अलीकडेच श्री. पिनाकिन कर्वे यांनी club  ला भेट दिली. त्यात त्यांनी भारतातील पक्षीवैविध्याची त्यांच्या खास शैलीत ओळख करून दिली.
  अगदी बंड्या (किंगफिशर),खंड्या  ( पांढऱ्या गळ्याचा किंगफिशर) ते हिमालयीन स्थलांतरित पक्षी त्यांची विविध रूपे यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर गारूड केले. महाविद्यालयाच्या विस्तीर्ण परिसरात अनेक पक्षी आहेत. त्यांच्या अस्तित्वाबद्दल अभिमान बाळगतानाच त्यांच्या संवर्धनाबद्दलची जाणीव सगळ्यांना अंतर्मुख करून गेली. 
            सुरुवातीला केवळ पक्षी निरीक्षणाच्या  उद्देशाने स्थापन करण्यात आलेला WINGS &WHISTLE ORNITHILOGY CLUB पंख विस्तारतो आहे. श्री. पिनाकिन कर्वे,डॉ. मनीषा कुलकर्णी,आणि प्रा. स्वप्नेश रांगणेकर यांनी या पंखाना नवी उर्जा बहाल केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कुतूहलाला एक नवी दिशा मिळते आहे.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या CLUB मध्य सहभागी होऊन या स्वैर आकाशमित्रांच्या सहवासात स्वतःला वृद्धिंगत करावे असं मानस यावेळी पक्षी मित्रांनी व्यक्त केला...
So ,friends CAN YOU HEAR SOME WINGS & WHISTLES ?

http://epaper.loksatta.com/25373/indian-express/17-02-2012#page/24/२ मराठी दैनिक लोकसत्ता (व्हिवा) पुरवणी मध्ये Ornithology Club! 

Friday, December 23, 2011

प्रजासत्ताक 'दीन'





२६ जानेवारी २०१२ :
१.
            सकाळीच ऑटो मध्ये बसले होते. शेजारी एक २८-२९ वर्षीय तरुण हातात मोठाले समान घेऊन बसला होता. थोड्या अंतरावर गेल्यावर त्याने चमकून चुळबूळ सुरु केली. ''ये अभी तक यही है? xxx" असं पुटपुटत त्याने घाईनेच खिशातून mobile बाहेर काढला१ आणि म्हणाला;'' अबे पहले दुकान में जा! झंड क्या खरीद रहा है? २६ जानेवारी फिरसे आएगा लेकीन  आज दुकान नाही गया तो तेरा आजका पैसा जरूर जाएगा!! झेंडा छोड पहले दुकान में जा! बडा आय देशप्रेमी !!!   mobile बंद करून पुन्हा झेंड्याच्या नावावर काहीबाही पुटपुटत तो शांत झाला.

        इथे माझ्या डोक्यात भलतंच वादळ घोंघावायला लागल....प्रजासत्ताक दिन इतका दीन होऊन सुरु व्हावा....वाटल याला विचारावं, बाबा रे तुला नाही वाटत देशाबद्दल काही...? इतक्यात रिक्षाचालकानेच त्याला हसत हसत म्हटलं क्या हुआ? एक दिन से क्या होगा? छोटा है ... त्यावर त्याच उपहासात्मक प्रत्त्युत्तर...''अरे ये दिन नाम का है.... वहा दिल्ली में मना रहे है ना यहा कोई कुकचा नाही देगा.. तिरंगा बेच रहे है.... वैसेभी अभी देशकी  हालत तो देख रहे हो ना? गरीब तो गरीब हि रहेगा फुकट झेंडा और सलामी!! xxx 

         एवढ्यात ऑटो थांबली न राहवून त्याला मी विचारलं.. ''भाईसाब आपकेही चुने हुये बंदे है सारे! ऐसे सिर्फ बोलके क्या फायदा? बदलानाही है तो खुद्से शुरुआत  करो... शुरुआत तो हो जाए....''

बोलले खरी... पण त्याच वाक्य मनातून जाईना; तिरंगा बेच रहे है...


२.
               रस्त्यात भली मोठी लेझीम पथके चालली होती शाळकरी मुले/त्यांचे शिक्षक छान उत्साहात सगळ्यांना शिस्तीत     प्रजासत्ताक दिनाच्या प्रभातफेरीत सामावून घेत होते.... एकदम मस्त वातावरण होत... काही मुल महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या वेशात गंभीर मुद्रेने भारताचा झेंडा हातात अभिमानाने मिरवत होती.......
          
        एक आज्जी शेजारीच उभ राहून पाहत होत्या...'' ही लहान मुल असे देशप्रेमाचे संस्कार गिरवताना पाहून इतक प्रसन्न वाटतंय....'' असं म्हणून आजी समाधानाने हसत होत्या.'' मलाही पटलं त्याचं म्हणण..
खरच... हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या...!!! मुले सुरात गात होती तल्लीन होऊन!!
संध्याकाळी मैत्रिणीकडे गेले तिला सांगत होते हे सगळ...तेवढ्यात तिची लहान बहीण आली. कुठे तरी जाण्याच्या तयारीत असलेली...''पल्लवी ताई, hi !! मीपण तिला'' hi !!''  म्हटलं.''.खेळायला  का?'' मी सहज विचारलं.
           ''नाही ग.... सकाळी प्रभातफेरी होती ना...असे पाय दुखतायत म्हणून सांगू जरा वरच्या खोलीत जाऊन झोपते हे २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट म्हणजे वैताग असतो नुसता....लेझीम ,प्रभातफेरी असं डोक्यात जातात म्हणून सांगू .........'' मी आ वासून पाहत राहिले.......


 समाधानाने प्रभातफेरीकडे पाहणाऱ्या आजींचा चेहरा दीनवाणा होतोय असं वाटत राहिलं.....

Wednesday, December 21, 2011

एक तरल अनुभव...

              थंडीचे दिवस...सकाळी बाहेर पडून धूसर वातावरणात चालत राहावं.. Morning  walk  च्या निमित्ताने बाहेर पडलेल्यांचा अशा वेळी सगळ्यात जास्त हेवा वाटतो. आपल्याच धुंदीत चालणारे..गाणी म्हणत चालणारे......सगळ्यांचाच! कुठे तरुणाईचे health groups आणि नियमित laughter club मध्ये धम्माल करणारे... कामावर जाताना वाफाळलेल्या चहाचे कप आणि गरम पोह्यांचा आस्वाद घेणारे....सगळेच गुलाबी बातावारणात स्वतःचा एक वेगळा  ठसा उमटवत असतात... अगदी वर्तमानपत्रात गायब झालेला विक्रेतासुद्धा!!  
             प्रत्येक स्थानकादरम्यान रंग बदलत जाणार आकाश! जांभळ ,लाल,गडद लाल,नारिंगी आणि पिवळ....हवेहवेस वाटणारे उबदार सूर्यकिरण असा काही स्पर्श करून जातात कि वाटावं सुरुवातच झकास झाली! सार काही अनुभवायलाच हव इतक अस्सल आणि तरल... चोहोदिशनी झोंबणारा सुखद वर आणि त्यात उगवलेला सूर्यतारा! त्याचं निर्मल अस्तित्व बिंबून जात... आणि मग पक्ष्यांचे उडणारे थवे ठळकपणे दिसू लागतात.प्रसन्न किलबिलाटाने तो क्षण खऱ्या अर्थाने रम्य ठरतो!
              खर तर लहानपणापासून हे क्षण आजीच्या गोष्टीतून,बालकथांमधून,छोट्या छोट्या कवितांमधून नंतर शालेय निबंधांमधून, ललित  साहित्य आणि पुस्तकांमधून आपण वेचत असतोच...पण या स्वछंदी आगमनाची आणि निसर्गाच्या कुंचल्याची किमया अनुभवताना  आणि त्याच्या छायेत वावरणार माणसाचं अस्तित्व पाहतानाची जादू निराळीच आहे! अशावेळी अविरत कष्ट करणाऱ्याचा शीण पळून  नव्या उमेदीने आरंभ होत नसेल  तर नवलच !!!!!