Friday, December 23, 2011

प्रजासत्ताक 'दीन'





२६ जानेवारी २०१२ :
१.
            सकाळीच ऑटो मध्ये बसले होते. शेजारी एक २८-२९ वर्षीय तरुण हातात मोठाले समान घेऊन बसला होता. थोड्या अंतरावर गेल्यावर त्याने चमकून चुळबूळ सुरु केली. ''ये अभी तक यही है? xxx" असं पुटपुटत त्याने घाईनेच खिशातून mobile बाहेर काढला१ आणि म्हणाला;'' अबे पहले दुकान में जा! झंड क्या खरीद रहा है? २६ जानेवारी फिरसे आएगा लेकीन  आज दुकान नाही गया तो तेरा आजका पैसा जरूर जाएगा!! झेंडा छोड पहले दुकान में जा! बडा आय देशप्रेमी !!!   mobile बंद करून पुन्हा झेंड्याच्या नावावर काहीबाही पुटपुटत तो शांत झाला.

        इथे माझ्या डोक्यात भलतंच वादळ घोंघावायला लागल....प्रजासत्ताक दिन इतका दीन होऊन सुरु व्हावा....वाटल याला विचारावं, बाबा रे तुला नाही वाटत देशाबद्दल काही...? इतक्यात रिक्षाचालकानेच त्याला हसत हसत म्हटलं क्या हुआ? एक दिन से क्या होगा? छोटा है ... त्यावर त्याच उपहासात्मक प्रत्त्युत्तर...''अरे ये दिन नाम का है.... वहा दिल्ली में मना रहे है ना यहा कोई कुकचा नाही देगा.. तिरंगा बेच रहे है.... वैसेभी अभी देशकी  हालत तो देख रहे हो ना? गरीब तो गरीब हि रहेगा फुकट झेंडा और सलामी!! xxx 

         एवढ्यात ऑटो थांबली न राहवून त्याला मी विचारलं.. ''भाईसाब आपकेही चुने हुये बंदे है सारे! ऐसे सिर्फ बोलके क्या फायदा? बदलानाही है तो खुद्से शुरुआत  करो... शुरुआत तो हो जाए....''

बोलले खरी... पण त्याच वाक्य मनातून जाईना; तिरंगा बेच रहे है...


२.
               रस्त्यात भली मोठी लेझीम पथके चालली होती शाळकरी मुले/त्यांचे शिक्षक छान उत्साहात सगळ्यांना शिस्तीत     प्रजासत्ताक दिनाच्या प्रभातफेरीत सामावून घेत होते.... एकदम मस्त वातावरण होत... काही मुल महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या वेशात गंभीर मुद्रेने भारताचा झेंडा हातात अभिमानाने मिरवत होती.......
          
        एक आज्जी शेजारीच उभ राहून पाहत होत्या...'' ही लहान मुल असे देशप्रेमाचे संस्कार गिरवताना पाहून इतक प्रसन्न वाटतंय....'' असं म्हणून आजी समाधानाने हसत होत्या.'' मलाही पटलं त्याचं म्हणण..
खरच... हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या...!!! मुले सुरात गात होती तल्लीन होऊन!!
संध्याकाळी मैत्रिणीकडे गेले तिला सांगत होते हे सगळ...तेवढ्यात तिची लहान बहीण आली. कुठे तरी जाण्याच्या तयारीत असलेली...''पल्लवी ताई, hi !! मीपण तिला'' hi !!''  म्हटलं.''.खेळायला  का?'' मी सहज विचारलं.
           ''नाही ग.... सकाळी प्रभातफेरी होती ना...असे पाय दुखतायत म्हणून सांगू जरा वरच्या खोलीत जाऊन झोपते हे २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट म्हणजे वैताग असतो नुसता....लेझीम ,प्रभातफेरी असं डोक्यात जातात म्हणून सांगू .........'' मी आ वासून पाहत राहिले.......


 समाधानाने प्रभातफेरीकडे पाहणाऱ्या आजींचा चेहरा दीनवाणा होतोय असं वाटत राहिलं.....

No comments:

Post a Comment