लहानपणी कोणत्या गोष्टीची भीती वाटते? असा प्रश्न विचारला कि माझं उत्तर 'कुत्र्याची' हे ठरलेल असायचं. हळूहळू कुत्रा हा पाळीव प्राणी म्हणून परिचयाचा झाला. लोक कुत्रा घरात प्रेमाने पाळतात हेही कळल.
सोसायटीमध्ये एका दादा कडे डॉबरमँन होता. त्याच भुंकण ऐकूनच धडकी भरायची.
तो कधी चावल्याच ऐकिवात नव्हत पण अगदी मित्रासारखा वगैरे मलातरी वाटला नाही.
खेळताना राजू दादाने त्याला मैदानातून हाक मारली "रॉकी…" कि सगळ बालमंडळ लपाछुपीच नाटक करायचं. मैदान क्षणात एकदम मोकळ! आणि चौथ्या मजल्यावरून धडधडत आणि सगळ्यांना धडधडवत रॉकी दिमाखात खाली यायचा. तो सोसायटीच्या गेट मधून दृष्टीआड होईपर्यंत बाहेर पडायची कोणाचीच बिशाद नसे.
रस्त्यावरून जाताना कुत्र्याचा आवाज आला कि माझी पाचावर धारण बसणार हा अलिखित नियम.…
.
अस हे कुत्रे-भय पुराण माझ्यासोबत सुरूच राहील. कॉलेज मध्ये आमच्या आवडत्या प्राध्यापिका नेहमी कुत्र्यावर फार माया करीत. त्यांच्या निमित्ताने कुत्रा शेजारी असण संयमाने कस सोसाव याचे धडे मिळत होते. पण या संयमाचा उद्रेक त्यांच्याच घरी होईल अस मला कधीच वाटल नव्हत.तर झाल अस की,एकदा आम्ही ५ जण आमच्या त्यांच्या घरी गेलो होतो. मी त्यांच्या घरी कुत्रा आहे ऐकून होते. आणि तो मायाळू आहे हेसुद्धा ऐकून होते. त्यामुळे मनाची तयारी केली होती.'' घाबरायचं नाही . मायाळू कुत्रा आहे.''
आम्ही त्यांच्या दारात उभे होतो; दारावर लिहिलं होत," भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे" हुश्श! पुन्हा "एकदा घाबरायचं नाही. मायाळू कुत्रा आहे." असा जप करत मी दारावरची बेल वाजवली आणि आतून मायाळू हाका सुरु झाल्या.
पुन्हा माझ घाबरण सुरु झालं. आमच्या मॅडम प्रसन्न हसत दारात उभ्या होत्या आणि आमच लक्ष खिळल होत त्यांच्या पायाशेजारच्या फिक्कट पांढर्या रंगाचा मोठाला कुत्र्याकडे! त्याने आम्ही घरात यायच्या आधीच भुंकायला (सॉरी) हाक मारायला सुरुवात केली. मी दारातच घुटमळले. मॅडमच्या ते लक्षात आलं. " अगं तुम्ही आवडलात त्यांना बाकी काही नाही" असं बोलत हसत हसत त्यांनी मागे वळत म्हटलं,"गुंडूळ, आत जा, आणि कल्लू, तुपण रे!"
मला उगीचच थोडं अपराधी वाटलं. (आणि माझ्या कुत्रांच्या भय -पुराणात आणखी एका आख्यायिकेची भर पडली. आणि माझी भीती वाढली हो गोष्ट वेगळी.) लायब्ररीबाहेर येतानासुद्धा मी दोघांचा कानोसा घेत हळूहळू बाहेर आले. दोघेही माझ्याकडे पाहतायत असा मला भास होत होता. नंतर आम्ही बोलत असताना आमच्या समोर मुकाट्याने बसलेले हे दोघे मघाचेच का याच कोड मला उलगडत नव्हत. माझे मित्रमैत्रिणीसुद्धा मुद्दाम त्यांना "सो स्वीट डॉगी" अस म्हणत माझ्याकडे पाहून हळूच हसत होते. माझी एक मैत्रीण तर गुंडूळ ला गोंजारत बसली होती." ते पाहून मला आणखी वाईट वाटलं
जरा जास्तच घाबरलो असही वाटलं.
आम्ही निघालो तेव्हा गुंडूळ आमच्याकडे पाहत शांतपणे उभा होता. मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा आणि स्तब्ध झाले. इतके निरागस आणि बिचारे डोळे!! वाटल, "आपणच घाबरवल कि काय ह्याला?" तेवढ्यात मॅडम 'काय गं? काय झाल?" अस म्हणाल्या तेव्हा मी भानावर आले. मला दोघांचीही फारच दया आली. थोड घाबरतच मी जाऊन गुंडूळच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याने उभा राहून शेपूट हलवत त्याचा आनंद व्यक्त केला.
(क्रमश:)
No comments:
Post a Comment