मॅडम च्या घरी घडलेल्या किस्स्यानंतर मी कुत्र्यांची जास्त धास्ती घेतली. अजून माझी भीती गेलेली नाही यावर शिक्कामोर्तब झाल होत. रस्त्यावरील कुत्र्यांची मला जितकी भीती वाटत नसेल तितकी पाळीव कुत्र्यांची वाटते हेही कळून चुकलं होत.
ता. क.: राज ठाकरेंच्या पाळीव 'बॉन्ड' ने त्यांच्या सौ. वर केलेला हल्ला नेमका हि पोस्ट टाकताना ताजा आहे :(
एकदा एका स्नेहींकडे गेले होते. बाहेर मोठी पाटी लिहिली होती. कुत्र्यांपासून सावध रहा. कृपया बेल वाजवा. मला आजूबाजूला कुत्र्याची चाहूल लागेना. पुढे जाव कि शेजारची बेल वाजवावी? कि सरळ फोनच करावा या संभ्रमात असताना माझ लक्ष समोर गेलं. आणि माझ उरलं सुरलं अवसानसुद्धा गळून गेलं :( एक काळ्या रंगाचं भयानक दिसणारं धूड माझ्याकडे निरखून पाहत होत आणि मी बेल दाबणार एवढ्यात त्याने मानेला एक जोराचा हिसडा देत माझ्या दिशेने कूच केलं… सोबत भुंकण सुरूच होत. दिलासा देणारी गोष्ट एकाच कि या पाळीव डॉगीला बांधून ठेवल्याने जमीन अस्मान एक करत त्याच भुंकण सुरु होत आणि माझी अवस्था एखाद्या वाळलेल्या गळून गेलेल्या पानासारखी भरकटली होती. एवढ्यात आमचे स्नेही बाहेर आले. "नॉरा, शांत बस पाहुणे आलेत आपल्याकडे" अस म्हणत त्यांनी मला अतिशय प्रेमाने "ये ग घाबरू नकोस काही करत नाही ती;आत ये" अस म्हटलं.
मला मनात वाटलं,"यांना काय जातंय बोलायला? :( पाहुणे म्हणे आलेला माणूस स्वतःहून पळून जायचा हे अस भुंकण ऐकून!":( :( :(
तरी मी शक्य तितक स्वतःला आवरून त्या नॉरासमोरून दबकत दबकत चालू लागले.
"अग भीती वाटत असेल तर मागच्या दराने ये;आलोच मी!" अस म्हणत काकांनी मला दुसर्या दारातून यायला सांगितलं. मला गम्मत वाटली म्हणजे माणूस घाबरला तर मागून नाही घाबरला तर पुढल्या दराने हे सुद्धा लक्षात ठेवलाय घर बांधताना :) वाह!
आत गेले तरी नॉराबाई भुंकत होत्या. त्याच आमच बोलण सुरु झालं. आणि मला काका म्हणाले," थोड खाऊन घेऊयात आपण" मी निमूट 'हो' म्हणाले . काकू लगबगीने," काय खाणार तू? हे देऊ? ते देऊ?" विचारू लागल्या. माझ लक्ष आता बंद झालेल्या आवाजाकडे होत आणि काकांनी नेमक ओळखलं आणि ते हसू लागले. माझी स्वतःत लागलेली तंद्री मोडून मी त्यांच्याकडे पाहू लागले. " किती घाबरावं माणसाने? काही करत नाही ती. हो दिसते खरी भयानक पण फार प्रेमळ आहे." मी नुसतं "हो का?" अस काहीसं म्हणाले. "अग हो, तुला माहितेय का? आमचा नातू तर बसतो तिच्यावर चक्क आणि तीपण मस्त एन्जॉय करते त्याला फिरवते सुद्धा!; कस आहे माहितेय का?" एव्हाना मी 'आ' वासून ऐकत होते… त्यातच मी भारावून त्यांच्या प्रश्नाला "नाही" अस उत्तर दिलं
" अरे १ वर्षाचा मुलगा घाबरत नाही? असं कसं? च्या आपण उगीचच घाबरलो असं पण वाटलं "
काकांच्या गडगडाटी हसण्याने मी पुन्हा भानावर आले." अरे हो तुला कस ठाऊक असेल मी सांगितल्याशिवाय" यावर मी माझ्या वेडेपणावर हसू लागले. काकूही हसतच होत्या. पण एकंदरीत त्यांना माझ घाबरण आवडल नसावं. काका पुढे म्हणाले "तिला आम्ही बांधलीये गं. पण हा प्राणी इतका प्रामाणिक असतो न। तिचे एकेक किस्से ऐकशील तर तुलासुद्धा आवडायला लागेल आमची नॉरा! हिच तर फार जीव आहे तिच्यावर." मी फक्त मान हलवली. काकू सांगू लागल्या "मागे मला बर नव्हत आणि मी एकटीच होते घरात तर ही रात्रीची माझ्या बिछान्याभोव्तली फेऱ्या घालत राहायची. अगदी सकाळी ५.३०-६ वाजेपर्यंत " हे ऐकून मला नवल वाटलं. किती चूक करतो आपण ओळखण्यात अस वाटून गेलं.
बोलता बोलता काकूंनी,"चल थोड खाऊन घेऊया" अस म्हटलं आणि त्यांच्या नाश्त्याच्या खोलीत आम्ही जाणार एवढ्यात नॉरा बाई हाक मारत आल्या. तिचं कौतुक ऐकून मला छान वाटल होत आणि फक्त त्यामुळेच मी तिच्या भुंकण्यातून मार्ग काढत नाश्ता करण्याच्या खोलीत (वरवर)धीराने प्रवेश केला. आणि पुन्हा नॉराबाई माझ्याकडे झेपावू लागल्या. " एक बिस्कीट भरव तिला तुझ्या हाताने ; त्यासाठीच चाललाय तिचा अट्टाहास" काकू अगदी लाडात सांगू लागल्या; " हो हो देतेय ह तुलासुद्धा!!" अस म्हणत तिच्या डोक्यावर हात फिरवू लागल्या आणि नॉरा काकूंचा हात जिभेने चाटू लागली. त्याही प्रेमाने तिला गोंजारत होत्या. एवढ्यात माझ्या हातात काकांनी बिस्कीट दिलं आणि एखाद्या योद्ध्याला सांगाव तस "जा,हे भरव तिला" अस सांगितलं. त्याचं गमतीदार हसण मला त्यावेळी तरी अज्जिबात आवडला नाही. मी धीर करून तिला एका बिस्कीट देऊ केलं. देऊ केल काय फेकलंच. काकुनी माझ्याकडे विखारी पाहिलं आणि पुन्हा मावळ होत मला म्हणाल्या "अस नाही घेत ती अज्जिबात! राणी आहे आमची! मी दाखवते तुला कस भरवायच ते" अस म्हणत त्यांनी मला माझा हात हातात घेऊन तिच्या तोंडात बिस्कीट कस भरावयाच हे शिकवलं आणि त्याच दरम्यान नोराबाईची अडीच-तीन इंची जीभ माझा हात चाटू लागली. किळस वाटली मला आणि चेहरा शून्य ठेवून मी एखद्या रोबोसारखी उभी राहिले होते. काकू त्यापुढे काय म्हणाल्या हे मला अजूनही आठवत नाही. खाण माझ्या पोटात गेल नाही ही गोष्ट वेगळीच. घरी जाई पर्यंत मला तिची जीभ आणि सर्द झालेली मी याव्यतिरिक्त काहीही आठवत नव्हत. मी जाता जाता तिच्या कडे पाहिलं तेव्हा नॉरा अख्खा जबडा उघडून माझ्याकडे पाहत होती. माझ्या चेहर्यावरची नाराजी माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
मी काकूंशी बोलत असताना पुन्हा नॉराबाई माझ्या दिशेने येऊ लागल्या. मी निघून जाऊ शकत नव्हते आणि प्रचंड घाबरले होते. एवढ्यात नॉराने माझ्या पायाचा तळवा चाटायला सुरुवात केली. माझ्या पायाला आधीच जखम झाली होती आणि नॉरा नेमकी तेच बोट चाटत होती. "तुला काही लागलय का पायाला?" मी हसत हो म्हटलं"क्रिकेट खेळताना जखम झाली होती" काकू आता मनापासून हसत म्हणाल्या" हम्म तेच कळलय आमच्या बाईंना. लवकर भरून यावी जखम म्हणून चाललाय हे सगळ!" नॉराबद्दलची किळस जाऊन जिव्हाळा वाटू लागला माझ्याही नकळत मी हाताने तिला गोंजारलं भले भीत भीत गोंजारलं :)
समाप्त.