कुंद हवा दाटे आज
कानी येई अल्लड गाजI
तेच आकाश तेच ढग
तरी वेगळे वाटे जगI
विज्ञानाचे आडाखे चुकवून
अचानक सांडे कोवळे ऊन,
ऊन-सावल्यांचा खेळ सारा
मोसमी वारे अफलातूनI
आगमनाची सारी वर्दी
पाऊस झेलण्या आले दर्दी..
सफेद कापूस गडद रंग,
पाऊस- कौतुकात सारे दंगI
झिम्माड पाऊस ओली माती
पक्षी सारे गाणे गातीI
ओल्या सरी हिरवे रान..
पाहून सारे हरपे भान..
निसर्ग सारा गोड निरागस
किती कौतुक गावे रे?
विरले सारे पाश आता
सरींच्या गावा जावे रे!
No comments:
Post a Comment