Saturday, December 23, 2017

सांता-एक फीलिंग

लहानपणी एक-दोन वेळा सॉक्स ठेवायचे खिडकीत २४  डिसेंबरच्या रात्री...सकाळी उठून कुतूहलाने पाहायला जायचे. कधीच काहीच नसायचं त्यात!😢
हळूहळू लक्षात आलं सांता बाबा अस्तित्वातच नाहीये भारतात. तो सिनेमात असतो, कथांमध्ये आणि स्वप्नात!!☺️

कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सिक्रेट सांता म्हणून गिफ्ट देण्याची आणि मिळण्याची गमतीशीर उत्सुकता असते. एकंदर मजा असते सगळी😊 गुपचूप गिफ्ट द्यायचं...आपलं गिफ्ट काय असेल याची उत्सुकता वेगळीच. त्यात ऑफिसमध्ये असे क्षण दुर्मिळ. 🤣

सो, आज सकाळी जाताना सगळ्यांसाठी चोकॉलेट्स घेऊन जावंसं वाटलं. सगळे गिफ्ट्स आणायला गेले आणि मी एक एक चॉकोलेट प्रत्येकाच्या टेबलवर ठेवलं. सोबत प्रत्येकासाठी साजेसा मजकूर असणारा कागद.😊

पहिल्यांदा जाणवलं ....हे सांताचं फीलिंग खूप छान असतं 'feeling of giving'😊  आणि एकट्या सांताबाबालाच ते जाणवतं... किंबहुना जाणवत असावं. बाकी सगळे आपपल्यात मग्न😊 
कोणी ठेवलं असेल याचा विचार करत एकमेकांना थँक्स म्हणत कुतूहल वाटत सगळे चॉकोलेट खात होते...

माझं टेबल मात्र सकाळी रिकामं होतं😄

हो!!हो!!!हो!!! असा गुणगुणत माझ्यातला सांता मोठ्यामोठ्याने हसू लागला😆😆😆

तुमचाच,
-आनंदी एकटा सांता😉
Merry christmas!!!