Saturday, December 23, 2017

सांता-एक फीलिंग

लहानपणी एक-दोन वेळा सॉक्स ठेवायचे खिडकीत २४  डिसेंबरच्या रात्री...सकाळी उठून कुतूहलाने पाहायला जायचे. कधीच काहीच नसायचं त्यात!😢
हळूहळू लक्षात आलं सांता बाबा अस्तित्वातच नाहीये भारतात. तो सिनेमात असतो, कथांमध्ये आणि स्वप्नात!!☺️

कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सिक्रेट सांता म्हणून गिफ्ट देण्याची आणि मिळण्याची गमतीशीर उत्सुकता असते. एकंदर मजा असते सगळी😊 गुपचूप गिफ्ट द्यायचं...आपलं गिफ्ट काय असेल याची उत्सुकता वेगळीच. त्यात ऑफिसमध्ये असे क्षण दुर्मिळ. 🤣

सो, आज सकाळी जाताना सगळ्यांसाठी चोकॉलेट्स घेऊन जावंसं वाटलं. सगळे गिफ्ट्स आणायला गेले आणि मी एक एक चॉकोलेट प्रत्येकाच्या टेबलवर ठेवलं. सोबत प्रत्येकासाठी साजेसा मजकूर असणारा कागद.😊

पहिल्यांदा जाणवलं ....हे सांताचं फीलिंग खूप छान असतं 'feeling of giving'😊  आणि एकट्या सांताबाबालाच ते जाणवतं... किंबहुना जाणवत असावं. बाकी सगळे आपपल्यात मग्न😊 
कोणी ठेवलं असेल याचा विचार करत एकमेकांना थँक्स म्हणत कुतूहल वाटत सगळे चॉकोलेट खात होते...

माझं टेबल मात्र सकाळी रिकामं होतं😄

हो!!हो!!!हो!!! असा गुणगुणत माझ्यातला सांता मोठ्यामोठ्याने हसू लागला😆😆😆

तुमचाच,
-आनंदी एकटा सांता😉
Merry christmas!!!

Sunday, April 2, 2017

फळांचा राजा-आंबा !!


आहारासंदर्भात फेसबुक, ट्विटर , गूगल वर वाचलेलं किंवा कोणीतरी सांगितलेलं असा बरंच काही असतं...  खर असतं का? आणि जर हो, तर नेमकं कितपत खरं असत? याचा उलगडा करण्यासाठी NutriTales!!माझी नवी युट्युब वाहिनी!! आवडलं तर नक्की सांगा (like), शेअर करा आणि सबस्क्राईब (subscribe) करा.
उन्हाळ्यात फळांचा राजा आंबा आणि त्यासंदर्भात थोडंसं इथे पोस्ट करतेय :)