इयत्ता ८वी...
आमच्या वर्गात एक मात्र होतं... मुलांमध्ये रेगेच्या डोक्याला पर्याय नव्हता. अतिशय खोडकर आणि हजरजबाबी.. काहीही विचारा. उत्तर नाही असे होणे नाही.
आमच्या इंग्लिशच्या मॅडम एकदम क्वीन....सगळ्यांच्या आवडत्या. शेवटचा तास.. आधीच कंटाळा आलेला... कधी बेल होते आणि घरी पळतोय असं झालेलं.. वर्गात नुसता गोंधळ...आणि एकदम रेगेला मॅडमनी प्रश्न विचारला,
"केक आवडतो का रे तुला?"
सगळ्यांच्या माना खट्कन रेगेकडे वळल्या.
"हो" त्याने मोठ्ठा होकार भरला.
" डंग केक आवडतो?"
हे काय प्रकरण असावं?
रेगेलासुद्धा हा बाउन्सर असावा. तो थोडा गडबडला.
मॅडम एकदम न्यूट्रल. त्यांनी पुन्हा विचारण्याआधीच रेगे "हो" म्हणाला.
"मॅडमनी एकदम मोठ्ठे डोळे करत म्हटलं, काय सांगतोस; यू लाइक डंग केक...वा."
पुढे काहीही न बोलता मॅडम (कदाचित.गालातल्या गालात) हसत निघून गेल्या.
आता मात्र हे काहीतरी वेगळं आहे हे आमच्या लक्षात आलं.
शाळा सुटल्यावर घरी आल्यावर पहिली उडी मारली ती विरकरवर...त्यात डंग....डी डी डी.
. ए.ए...ए..श्या हा तर शब्दच नाही...मोर्चा ऑक्सफर्डकडे....यातपण कसं नाही...🤔😭
.पपांना विचारलं... "पपा डंग केक म्हणजे काय?"
"काय?"
"डंग केक म्हणजे काय?"
"असा काही केक नसतो" असं म्हणत पपा हसल्यासारखे वाटले...त्यांचं डोकं पुन्हा पेपरमध्ये.
"अहो असतो....तो खूप चविष्ट असतो."
"ह्म्म"
"हो ना?"
" काय?" 😳त्यांचं कदाचित लक्ष नसावं.
"डंग केक कशाचा बनवतात पपा?"
आता मात्र पपानी पेपर बाजूला केला. तुला कोणी सांगितलं हे?
मग मी त्यांना सगळा किस्सा सांगितला...त्यावर पपा जोरजोरात हसू लागले आणि म्हणाले... dung असं स्पेलिंग शोध...
शेण....
डंग केक... सुकलेलं शेण...
बापरे पपा रेगेने खरंच खाल्लं असेल का हो??
यावर पपा आणखी जोरात हसू लागले.
-झुळूक
(बाकावरचे किस्से)
२०/८/१६