मैत्रिणीच्या घरी गणपती होता. उकडीच्या मोदकांचा सुगंध दरवळला होता . दरवर्षीप्रमाणे यावर्षी जोरात आरती सुरु होती. येई ओ विठ्ठले माउलिये सुरु झालं . निढळावरी करSS बराच ताणल. मज्जा आली. घरी येऊन इतकं प्रसन्न वाटत होतं. भुर्रकन २० वर्षं मागे गेलं.
गणपतीच्या सुटीत शाळेतून अभ्यास जायचा. ती वही करताना लक्ष खिडकीबाहेर असायचं. दादा- ताई मैदानात जमत. मला अचानक भूक लागे. चल जेवूया. म्हणत मी माझ मलाच वाढून घेई.
" अभ्यास झाला?"आई विचारे
"हम्म …. मी खाता खाता काहीतरी सांगायचा प्रयत्न करी"
"आरतीला जायची घाई नको. सगळे सावकाश जेव गं। वेळ आहे अजून"
गणपती बाप्पा SSS मोरया । मंगलमूर्ती मोरया SSS
"झालंपण "
"पाणी तरी पिऊन "…… पूर्ण होईपर्यंत माझी स्वारी उद्या मारत असे
"पल्लू आरती सुरु झाली सुद्धा गं" म्हणत एव्हाना जीत कधीच पळाला आरतीसाठी.
पहिली आरती आज देशपांडे काकांकडे सुरु झाली. मी त्यांच्या दारात पाहिलं …पूर्ण गर्दी. त्यातून जागा काढत काढत मी पुढे जाई. मध्येच एखादी बसे. "अरे अरे आज टाळ दिसत नाही "" हे काय पिंकीच्या हातात "चला, आज टाळ्याच फक्त :("
समोर प्रसन्न बाप्पाची मूर्ती दिसे. देशपांडे काका छान धोतर-उपरणे नेसून आरती हातात घेऊन उभे असत . काकू आलीस का ये हो असा एक दृष्टीक्षेप टाकत मी एका डोळ्याने त्यांच्या शेजारच्या प्रसादाच्या ताटाकडे लक्ष देऊन काय बारा असावं आज असा विचार करत उत्साहाने जय जय घोषात एकरूप होऊन जाई.
शंकराची आरती "दुर्गे दुर्गत भारी" "शेंदूर लाल चढायो" "गजानना श्री गणराया" येई ओ विठ्ठले" सगळ्याच आरत्या आवडत. येई ओ विठ्ठले माझी आवडती आरती त्यामागोमाग दशावताराची आरती - दहावा अवतार म्हणताना तो 'र' एवढा लाम्बायचा आणि तो संपेल या आशेवर आम्ही टाळ्या किंवा ताल त्या तालात वाजवायचो. आमच्या कॉलनीत काहीजण भलतेच द्वाड होते (म्हणजे अजूनही आहेत :-p ) आरती सुरु असताना भलत्याच चाली सुरु करत. 'आरती ज्ञानराजा' ३ वेगवेगळ्या चालींवर . म्हणजे दर वेळी आम्हा लहान मुलांच्या टोळीचा गोंधळ उडे. आणि मग आम्ही मध्येच थांबलो कि आम्च्यातलंच स्मार्ट टाळक डोळे मिटून छुपी गद्दारी करत त्यात सामील होई. त्यात राजेश दादा हातानेच बोल बोल असे म्हणत हसून दोन मिनिटात आम्हाला पुन्हा सामील करून घेई. देशपांडे काका-पितळे काका- नंतर झा अंकल …. असा शिरस्ता असे. ५ दिवस धम्माल नुसती. आरती, प्रसाद , टाळ , आरतीची पुस्तकं -लहान पुस्तक मोठी पुस्तकं …लोकसत्ताच पुस्तकं , मटाच पुस्तकं, आणि मोठ्या दादांकडे नेहमी असणारं आयताकृती मोठ पुस्तक …. मला नेहमी वाटायचं माणूस जितका उंच तितक पुस्तक मोठ. या नियमानुसार आमच्या टोळीतील समस्त चमूकडे आरतीच्या विविध आकाराची पुस्तक असत. यादरम्यान आरती पाठ होऊ लागली. "ओं यज्ञेन यज्ञ" सुरु झालं कि सुरुवातीला वाटायचं कित्ती कठीण …. हे यायला हव तेही कालांतराने पाठ झाल हणजे ५व्या दिवशीपर्यंत सगळ्या आरत्या पक्क्या होत आणि जाणीव होई कि चालले बाप्पा …… शेवटची आरती दणक्यात होई. साग्रसंगीत.
आरतीसाठी सगळ्यात बेस्ट घर म्हणजे पितळे काकाचं! त्यांचा प्रसाद भारी असे. उकडीचे मोदक किंवा पेढ्याचे मोदक कधी चॉकोलेट कधी बुंदीचा मोठ्ठा लाडू (वॉव ) कधी नारंगी रंग तर कधी हिरवा-पिवळा… कधी कधी लिमलेटच्या गोळ्या…आणि मला न चुकता मिळणारा extra प्रसाद!! त्यामुळे त्यांच्या गणपतीची आरती म्हणजे जणू व्रत वाटे.
गौरीच आगमन झाल की आई आणि काकूंचा ग्रुप सुद्धा सामील होई. अस वाटायचं काय भारीये हे गणपती आणि गौरीवले सण . मोरे काकूंच्या घरी फुगड्यांचा बेत असे. दळवीकाकू , सावंत काकू ,राणे काकू , सुनिता ती सो ती ,योगिता सगळेच बेभान होत रात्र जगवायचे डीजे शिवाय! ती गाणी आणि वेगवेगळे आविष्कार पाहायला मला भारी वाटे. गम्मत म्हणून आम्हीसुद्धा फुगडी घालायचो. कोंबडा कधी जमेचना. काय धमक असायचा.
विसर्जनाच्या दिवशी सुदीप दादा आणि निलेश दादा गाडी सजवत. नारळीच्या फांद्या केळीच्या फांद्या ,फुलांचे हार बाप्पाची गाडी शानदार दिसे. मी कधी खिडकीतून तरी कधी गाडीसामोरच ती कलाकारी पाहण्यात किंवा करण्यात रमून जाई. फार गमतीशीर विचार यायचा मनात आपण पण बसव यात कसलं भारी वाटेल. मी एकदा विचारालाही होतं , "मीपण बसले तर ; तर काय तुझाही विसर्जन होईल " अरेअरे मग तो विषयच सोडून दिला आता गम्मत वाटते.
लहानपण देगा देवा च्या आठवणीत किती भराभर बदलल सगळ...
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे म्हणत विसर्जनासाठी अर्ध्यावर जाऊन परतणारी मी आईसोबत बडबड करत बसते. गणपतीच्या सुटीतला गृहपाठ हातात ठेवून तिला कितीतरी गोष्टी सांगते. तीपण ऐकते. मोदकच्या सारणाचा सुगंध घरभर पसरलेला असतो.