साद कोवळ्या मनाची शीळ हृदयी गुंजते,
तुझ्या आठवणीमध्ये माझे अस्तित्व रमते!
नादखुळा मी पाहतो आपल्या नात्याची पहाट,
तुझ्या अबोल्यात दडले त्याचे अर्थ... किती दाट!
माझ्या अंतरीची साद आहे मनस्वी तरल,
आहे नि:शब्द हि भाषा तिचा वेगळा दरवळ!
पाखराचे मन म्हणे असते चंचल.. अस्थिर..
मी आहे अंश तुझा नाही कुणी वेडा पीर!
नाते आपले नितळ... जसे मोकळे आभाळ,
तुला अर्पितो मी माझी..शीळ मनस्वी मधाळ!
'Facebook' वरील एका भिंतीवर पोस्ट केलेला हा फोटो ज्यासोबत एक वाक्य लिहील होत..
I wonder what's this little bird saying .. i can't think of any line and YOU??? तेव्हा हे सुचलेलं...