अगं किती हा पसारा तुझा? … आवर तरी तो …
कित्ती पसारा करतेस तू?
आवडतं का तुला असं पसाऱ्यात बसायला ? एक ना दोन … प्रत्येक वेळी हे असं काहीतरी ऐकाव लागतंच.
असाच एकदा सगळ आवरून so called पसारा ..काम करत बसले . नंतर जाणवू लागलं काहीतरी कमी आहे यार …काय तेच नेमक कळेना …अरे हो …ते पुस्तक वाचायचं राहिलंय खर..एक पुस्तक बाहेर काढलं.. तेवढ्यात आठवल ओह 'पोरवय' किती दिवसात वाचल नाहीये .. ते सुद्धा शेजारी ठेवलं पुन्हा वाचन सुरु!! वाचता वाचता एक सुंदर वाक्य वाचलं…किती छान विचार आहे . लिहून ठेवायला हवा …..
आणि कप्प्यातील वही काढली; हि नको ती नको finally माझी आवडती वही मिळाली ..आणि त्यात लिहायला सुरुवात केली …… आई बाहेर आली आणि ‘अगं काय हे पुन्हा तेच ? किती पुस्तक मांडून ठेवली आहेस स्वतःभोवती ….Ooops…. मीपण थोडावेळ बघत बसले पाहता पाहता काय काय मांडून बसले होते मी …पण छान वाटत होत त्या तशा पसाऱ्यात बसायला ! एक वेगळीच मजा येत होती . कसली माहित नाही पण आवडत होत ते पुस्तकाचं , पेन ,वही याचं आजूबाजूला असण…..
असाच विचार करता करता लक्षात आल .. हं, हे असं बसाल तर खरी गम्मत आहे. या वहीच्या पानात …बराच काही दडलेलं आहे ….माझं स्वतःच सगळ काही …..हे असं माझ्या जगाच्या गराड्यात बसलेलं आवडतंय … एका लेखकच लेखन इतक स्पर्शून जातंय कि ते पुस्तक वाचून पूर्ण झाल्याशिवाय बर वाटत नाहीये . किती किती काय काय विचार मनात येत होते …. पसाऱ्यात असाल कि वाटत बॉस.. something is going on…एका वेगळ्या वलयात बसलो आहोत आपण आपल्याभोवती हे सुंदर जग मस्त फेर धरून नाचतंय आपल्याभोवती सगळ भवताल वेगळ झाली आपलं......त्यात रममाण होऊन गेलो आहोत आपण! आणि हे क्षण कोणीही हिरावून घेऊ शकत नाहीये माझ्यापासून! माझे स्वतःचे मी जपलेले क्षण …..
अचानक कधी कधी याच पसाऱ्यात मला माझं बालपण भेटतंय तर कधी अल्लड मैत्रीचे क्षण … एखादी वही शोधता शोधता अचानक ग्रीटिंग कार्ड सापडत तर कधी अचानक कोणी भेट दिलेलं टूर गाईड …,पेन ,बुकमार्क ,अर्धी जाळी जमलेलं पिंपळपान…कुठूनतरी मिळवलेल मोरपीस ,जून शाईपेन ….एखाद महागड पेन …आणि बरंच काही ……
एखादी गोष्ट करण्यासाठी तशी वातावरणनिर्मिती व्हायला हवी …आणि हे काम आहे या पसाऱ्याच….
मुळात पसारा नाहीच आहे तो …ते जग आहे भारलेलं…..एका अनामिक उर्जेने ताज टवटवीत झालेलं ….ज्यात फक्त आणि फक्त निखळ आनंद आहे दुसर काहीच नाही . पुस्तक वाचण्याचा आनंद वेगळा आणि पसार्यात बसलेल असताना जपून ठेवलेला एखाद्या अत्यंत आवडत्या लेखकाचे सगळे लेख एकत्र केलेला संच सापडला कि जो आनंद होतो तो ज्याला संच सापडला आहे तोच जाणो! आणि मग त्यावेळी त्यातला एखादा लेख वाचल्याशिवाय राहवतच नाही ….
एकदा तर असेच चतुरा-मराठी पाक्षिकाचे निवडक अंक जपुन ठेवलेले आढळले …. कप्पा लावण्याच्या निमित्ताने ७-८ वर्षापूर्वीचा वृत्तपत्र -साहित्याचा अमाप खजिना हाती लागला होता…वेगवेगळ्या कथा ..लेख,कविता ,ललित सगळी मेजवानीच!….कप्पा लावण बाजूलाच राहिलं आणि त्या लेखांच्या जादुई दुनियेत अशी काही बुडून गेले ....…की भानच राहिलं नाही!!
एवढ्यात आईची हक ऐकू आली ,'' आज संपणार आहे का ग ? कि सगळ आजच वाचणार आहेस ? जरा पसारा आवर म्हटलं तर …तुझं आपल भलतंच….
पेपर्स ,पुस्तक ,अंक यांनी मला चोहीकडून घेरल होतं. चेहऱ्यावर मस्त समाधान आणि आश्चर्याच 'खुदकन'वाल खट्याळ हसू होत …कारण हे माझं जग होत …किती दिवसांनी अशी मस्त कागदी गराड्यात बसले होते ..त्यात काय नव्हत? माझे लाडके लेखक- कवी, त्यांचे लेख,कविता शिक्षकांच्या आठवणी ..मित्रमंडळी होती ,शाळा …खेळ ….उन ,पाउस सगळ एका ठिकाणी त्या 'पसाऱ्यात'..
मुळात प.सा.रा. म्हणजे :परिपक्व स्वसंवादाचा राजाश्रय …भन्नाट वेड लावणारं आणि तितकाच निखळ विश्व ….. एखाद्या निरागस बाळाइतक,आणि स्वच्छं आकाशासारख
अप्रत्यक्षपणे अल्लद आपल्या मनाच्या गाभारयातले रंग ओघाळवणार जग ……..आठवणींचा कोलाज तयार करणारा पसारा …मला आवडतो तुमच काय ?
तुम्हाला कोणत्या पसाऱ्यात रमायला आवडत?