पक्षी ..... अगदी लहानपणापासून पक्ष्यांबद्दल प्रत्येकाला कुतूहल असत!
अगदी खातानासुद्धा हा घास काऊचा हा घास चिऊचा अशी आपल्याही नकळत पक्ष्यांशी ओळख होऊ लागलेली असते. जस जसे मोठे होऊ लागतो तसे या पक्षीप्रेमाला निरनिराळे अर्थ प्राप्त होतात..कधी कवितेतून तर कधी निरनिराळ्या रूपकातून मानवी स्वभावाचे कंगोरे रेखाटणारे..अशा अनेक रुपात पक्ष्यांची ओळख होत राहते.
निरनिराळ्या पक्ष्यांच्या दुनियेत रममाण व्हायला कोणाला आवडत नाही? पण जर हे पक्षीप्रेम आणखी व्यापक होऊ पाहत असेल तर... याच कल्पनेतून उदयाला आला आहे जोगेश्वरीच्या इस्माईल युसुफ कॉलेज चा ORNITHOLOGY CLUB !
मुंबईत इस्माईल युसुफ महाविद्यालयात Ornithology Club २००९पसुन कार्यरत आहे.
डॉ. आनंद पेंढारकर यांनी या क्लबचे उदघाटन करण्यात आले होते. २००९ पासून क्लब अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात आले. पक्षीनिरीक्षण हा त्यातील महत्त्वाचा उपक्रम! आतापर्यंत क्लब च्या सदस्यांना B.N.H.S.,WWF या संस्थांमधील नामवंत अभ्यासकांचे मार्गदर्शन लाभले आहे. श्री. सौरभ सावंत, डॉ. लट्टू ,श्री. पिनाकिन कर्वे, श्री. मयुरेश खटावकर,श्री. पर्वेश पंड्या यांसारख्या अभ्यासकांनी आणि पक्शिनिरीक्षकानी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांचे पक्ष्यांबद्दलचे कुतूहल अभ्यासू वृत्तीत बदलण्यास हातभार लावला आहे.
प्रा. मनीषा कुलकर्णी, प्रा. स्वप्नेश रांगणेकर यांचा या क्लब च्या जडण घडणीत महत्त्वाचा वाटा आहे.
दरवर्षी क्लब तर्फे नवे नवे उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलेल्या विविध पक्ष्यांचे प्रदर्शादेखील भरविण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या ६० एकर campus मध्ये पक्षिवैविध्य आढळून येते. या पक्षांच्या निरीक्षनासोबातच त्यांच्या संवर्धनासाठी जागरूक राहणे महत्त्वाचे आहे.
केवळ महाविद्यालायातीलाच नव्हे तर विद्यार्थ्यांना विविध प्रदेशातील पक्ष्याची ओळख व्हावी यासाठी महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातर्फे ornithology club अंतर्गत अनेक अभ्यास-सहलींचे आयोजन केले जाते. या club मुळे अनेक विद्यार्थी पक्षीनिरीक्षण आणि पक्षिसंवर्धन यात सक्रीय झाले आहेत.
अलीकडेच श्री. पिनाकिन कर्वे यांनी club ला भेट दिली. त्यात त्यांनी भारतातील पक्षीवैविध्याची त्यांच्या खास शैलीत ओळख करून दिली.
अगदी बंड्या (किंगफिशर),खंड्या ( पांढऱ्या गळ्याचा किंगफिशर) ते हिमालयीन स्थलांतरित पक्षी त्यांची विविध रूपे यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर गारूड केले. महाविद्यालयाच्या विस्तीर्ण परिसरात अनेक पक्षी आहेत. त्यांच्या अस्तित्वाबद्दल अभिमान बाळगतानाच त्यांच्या संवर्धनाबद्दलची जाणीव सगळ्यांना अंतर्मुख करून गेली.
सुरुवातीला केवळ पक्षी निरीक्षणाच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेला WINGS &WHISTLE ORNITHILOGY CLUB पंख विस्तारतो आहे. श्री. पिनाकिन कर्वे,डॉ. मनीषा कुलकर्णी,आणि प्रा. स्वप्नेश रांगणेकर यांनी या पंखाना नवी उर्जा बहाल केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कुतूहलाला एक नवी दिशा मिळते आहे.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या CLUB मध्य सहभागी होऊन या स्वैर आकाशमित्रांच्या सहवासात स्वतःला वृद्धिंगत करावे असं मानस यावेळी पक्षी मित्रांनी व्यक्त केला...
So ,friends CAN YOU HEAR SOME WINGS & WHISTLES ?